तुम्हालाही वाटतं की लोकं तुमचा आदर करत नाही तर तुमच्या वागण्या बोलण्यात करा ‘हे’ बदल

आदर कसा मिळवावा: कामाच्या ठिकाणी किंवा घरात लोक तुमचा आदर करत नसतील तर तुमच्या सवयींमध्ये असे बदल करून पहा. यामुळे लोक लवकरच तुमचा आदर करू लागतील आणि तुमच्या शब्दांना महत्त्व देऊ लागतील.

सगळ्यांना इतरांनी आपला आदर (Respect) केलेला आवडतो. मग तो कुटुंबातील असो वा त्याच्या कामाच्या ठिकाणी. मात्र, बऱ्याचदा असं होतं की आपल्याला असं वाटत की, आपण काम चांगल करुनही, सगळ्यांशी योग्य वागुनही आपला कुणीच आदर करत नाही. अशा परिस्थितीत लोकांकडुन आदर मिळत नसेल, कुणीही तुमचं ऐकत नसेल तर आपला आत्मविश्वास गमावुन बसतो. जर, लोकांनी तुमचा आदर करावा असे तुम्हाला वाटत असेल तर या सवयी तुमच्या व्यक्तिमत्त्वात नक्कीच काही बाबी समाविष्ट करा.

नीटनिटकं राहणीमान

सर्वप्रथम तुम्ही स्वतःला कसे सादर करता हे पाहणं महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला चांगले कपडे घातलेल्या नीटनीटके राहणीमान व्यक्तीशी बोलायला आवडत.जर तुम्ही कपडे घालण्याच्या बाबतीत निष्काळजी असाल तर तुमचा आदर कमी होऊ शकतो.

भावनांवर नियंत्रण ठेवा
जेव्हा तुम्ही कोणाशी बोलण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. रागाच्या भरात खूप मोठ्याने बोलणे किंवा खुप आनंदाने व्यक्त करणेही चांगले नाही. समोरच्या व्यक्तीशी बोलताना भावनांवर नियंत्रण ठेवा. यामुळे तुमची छाप चांगली राहील आणि तुमचे बोलणे लक्षपूर्वक ऐकल्यानंतर लोक तुमचा आदर करू लागतील.

वेळेची काळजी घ्या
तुमचा वेळ खूप मौल्यवान आहे.जेव्हा तुम्ही इतरांना याची जाणीव करून द्याल, तेव्हा लोक तुमचा आणि तुमच्या वेळेचा आदर करू लागतील.

प्रतिक्रिया देणे आणि टिप्पण्या देणे टाळा
प्रत्येकाच्या प्रकरणात घाई करणे आणि आपले मत देणे टाळा. जेव्हा कोणी तुम्हाला विशेषतः विचारेल तेव्हाच तुमचे मत द्या. यामुळे लोक तुमच्या मताकडे लक्ष देतील आणि ते तुमचा आदर करतील.

कमी बोला
जे लोक जास्त बोलतात ते विचार न करता बोलतात. त्यामुळे ते कुणालाही आवडत नाही. नेहमी कमी बोला आणि विचारपूर्वक बोला. 

आत्मविश्वासाने बोला
समोरच्या व्यक्तीशी बोलण्यापूर्वी स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. जेणेकरून तुमच्या बोलण्यातून आत्मविश्वास दिसून येईल. ही वृत्ती तुम्हाला आदर मिळवण्यास मदत करेल. 

वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात काही नियम बनवा,
मग ते ऑफिस असो किंवा घर, दोन्ही ठिकाणी स्वत:साठी काही सीमा निश्चित करा.जेणेकरून व्यावसायिक जीवनात कोणीही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावू नये आणि तुमचा सहज अपमान करू शकणार नाही.

लोकांना प्रभावित करू नका
तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व चांगले बनवायचे असले तरी, कोणालाही प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नका. लोक स्वतः प्रभावित होतात आणि त्यांच्या कामाची काळजी घेणाऱ्यांचा आदर करतात.