शिमल्याला बर्फाचा गराडा, बर्फाच्छादित रस्त्यांमुळे वाहतूक बंद

शिमल्यातील अनेक भागांमध्ये सध्या बर्फवृष्टी होत असून हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भाग बर्फाने व्यापून गेलाय. शिमल्यातील जाखू भागाला तर बर्फामुळे अत्यंत देखणं रुप प्राप्त झालंय. डोंगरांवर, रस्त्यावर, झाडांच्या फांद्यांवर आणि जागोजागी पांढऱ्याशुभ्र बर्फाचे ढीग पाहायला मिळत आहेत.

हिमालयाच्या पायथ्याशी वसणाऱ्या शिमल्यात सध्या बर्फानं आपलं साम्राज्य प्रस्थापित केलंय. गेल्या काही आठवड्यांपासून शिमल्यात बर्फवृष्टी होत असून आता तापमानाचा पारा अधिकच घसरलाय.

शिमल्यातील अनेक भागांमध्ये सध्या बर्फवृष्टी होत असून हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भाग बर्फाने व्यापून गेलाय. शिमल्यातील जाखू भागाला तर बर्फामुळे अत्यंत देखणं रुप प्राप्त झालंय. डोंगरांवर, रस्त्यावर, झाडांच्या फांद्यांवर आणि जागोजागी पांढऱ्याशुभ्र बर्फाचे ढीग पाहायला मिळत आहेत.

या बर्फवृष्टीचा आनंद सध्या शिमल्यात आलेले पर्यटक लुटत आहेत. मात्र नव्याने शिमल्यात दाखल होऊ पाहणाऱ्या पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बर्फवृष्टीमुळे शहराकडं जाणारे अनेक रस्ते बंद आहेत. बर्फामुळे अनेक रस्ते घसरडे आणि वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी रस्त्याने प्रवास करताना विशेष खबरदारी बाळगण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय.

हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या हिमाचल प्रदेशात हिवाळ्यात तापमान शून्याजवळ पोहोचतं. त्यामुळं तिथं बर्फवृष्टी होते. अनेक भागात बर्फ साठल्यामुळे जनजीवनावर त्याचे विपरित परिणाम होत असतात. मात्र बर्फवृष्टीचा हा नजारा पाहण्यासाठी देशविदेशातील अनेक पर्यंटक या ऋतूतदेखील शिमल्यात गर्दी करतात.