नरभक्षक बिबट्याची दहशत ; आतापर्यंत घेतले १२ बळी

कर्जत : कर्जत तालुक्यात बिबट्याची वाढती दहशत काही केल्या कमी व्हायला तयार नाही . शेजारी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत . यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे . करमाळा तालुक्यातील फुंदेवाडी, लिंबेवाडी व अंजनडोह या गावात बिबट्याने हल्ला करून तीन बळी घेतल्याने आलेश्वर , पाचवड , तांदुळवाडी तर कर्जत तालुक्यातील निंबे, शेगुड, म्हाळगी या  गावच्या नागरिकांत कमालीचे भीतीचे वातावरण पसरल्याने वन विभागाने जनजागृती मोहीम सुरू केली आहे .

कर्जत : कर्जत तालुक्यात बिबट्याची वाढती दहशत काही केल्या कमी व्हायला तयार नाही . शेजारी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत . यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे . करमाळा तालुक्यातील फुंदेवाडी, लिंबेवाडी व अंजनडोह या गावात बिबट्याने हल्ला करून तीन बळी घेतल्याने आलेश्वर , पाचवड , तांदुळवाडी तर कर्जत तालुक्यातील निंबे, शेगुड, म्हाळगी या  गावच्या नागरिकांत कमालीचे भीतीचे वातावरण पसरल्याने वन विभागाने जनजागृती मोहीम सुरू केली आहे . सध्या करमाळा तालुक्यात बिबट्याने दहशत घातली आहे . कर्जत वन विभागाने बिबट्यापासून बचावासाठी आता समाज माध्यमांद्वारे जनजागृती मोहीम हाती घेतली आहे . तालुक्यातील निंबे, शेगुड,अळसुंदे व आसपास च्या ग्रामीण भागातील विविध गावात जाऊन वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी ऑडिओ व व्हिडिओद्वारे शेतकरी आणि ग्रामस्थांना बिबट्यापासून बचावासाठी जनजागृती करतआहेत. शेजारील करमाळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी मारले जात असलेल्या बातम्या व अद्याप बिबट्या जेरबंद न होणे . यामुळे दहशतीत असलेला तालुक्यातील शेतकरी शेतात जायला घाबरत आहे . परिणामी , शेतीची कामे पूर्णपणे बंद पडली आहेत.सध्या , रब्बी हंगामातील पिकांची , लागवड करण्यात आलेल्या पिकांना तसेच फळबागा व उसाला पाणी द्यायचे काम शेतकरी करत आहे . मात्र , सध्या तालुक्यात सगळीकडे बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने , तालुक्यातील सर्वच गावांतील शेतकरी त्यांच्या शेतात जायला घाबरत आहेत .नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत असून , लवकरच त्याचा शोध घेण्यात येईल .

कर्जत तालुक्यातील ऊस पट्ट्यात व काही गावात हा बिबट्या असल्याची चर्चा होत असली तरी त्यास अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही . त्यामुळे गावकऱ्यांनी घाबरून जाऊ नये बिबट्या जेरबंद होईपर्यंत योग्य ती दक्षता घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे .

-आदर्श रेड्डी, उपवनसंरक्षक, अहमदनगर

सोशल मीडियावरील छायाचित्रांनी भीतीत भर

तालुक्यातील काही गावात व उसाच्या शेतात बिबट्याचा संचार असल्याची चर्चा असून , सोशल मीडियावर काही छायाचित्रेही व्हायरल झाली आहेत .त्यामुळे दहशत निर्माण झाली आहे .गावात कोरोना .. शेतात बिबट्या .. गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याच्या वावराने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून , वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या ग्रामस्थांची धाकधूक वाढली आहे पंरतु ती नेमकी कर्जत तालुक्यातीलच आहेत का ? याची खातरजमा झालेलीं आहे व ही छायाचित्रे व चित्रफित कर्जत तालुक्यातील नाहीत.”अफवा पसरवू नका .. आमच्या गावात बिबट्या आला , आताच दिसला , तिकडून पळाला असे अनेक कॉल तहसील कार्यालय , पोलीस ठाण्यास व वनविभाग यांना आले आहेत. या प्राण्यास पकडण्यासाठी वन विभागाचे पथक आलेले आहे . ठिकठिकाणी पिंजरे लावण्याचे नियोजन झाले आहे . ग्रामस्थांनी अफवा पसरवून भीती निर्माण करू नये मात्र काळजी जरूर घ्यावी .जे कोणी अफावा पसरवीत असेल किंवा खोटी माहिती विनाकारण पसरवीत असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील कर्जत तालुक्यातील जामदारवाडा, पठारवाडी,बर्गेवाडी व मिरजगाव परिसरात बिबट्या दिसला हे वृत्त पुर्ण पणे खोटे असून अफवा पसरवून भिती निर्माण करण्यात येणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करू कर्जत तालुक्यात फक्त निंबे या एकाच गावात बिबट्या ची ठसे आढळून आली आहेत व निंबे व परिसरात पिंजरे लावली आहेत त्यामुळे कर्जत तालुक्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये” ,असे आवाहन कर्जत वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबीलवाड यांनी केले आहे

कर्जत तालुक्याच्या सिमेवर व करमाळा तालुक्यातील गावात बिबट्या ने हल्ला करून तीन बळी घेतले आहेत या नरभक्षक बिबट्या ला पकडण्यासाठी अहमदनगर, बीड, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील वनविभागाने एकत्रित बिबट्या पकडण्यासाठी कर्जत तालुका सरहद्दीवर व करमाळा तालुक्यातील अनेक गावात पिंजरा लावलेले आहेत. अहमदनगर येथील उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, बीड येथील तेलंग उपवनसंरक्षक, तर पुणे येथील एस आर सोनवणे सहा. वनसंरक्षक व कडू उपवनसंरक्षक तर कर्जत चे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबीलवाड, रेहेकुरी येथील वनक्षेत्रपाल केदार व करमाळा येथील वनक्षेत्र पाल याच्या सह १०० वनविभाग कर्मचारी या बिबट्या वर लक्ष ठेवून आहेत.