सासूरवाडीत जावयाचा खून प्रकरणी ३ जणांना अटक

अहमदनगर: श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथे आर्थिक कारणाच्या वादातून जावयाचा तलवारीचे वार करून खून केल्या प्रकरणी पोलीसांनी ४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून ३ जणांना तातडीने अटक केली आहे.

 श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव मधील घटना

अहमदनगर: श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथे आर्थिक कारणाच्या वादातून जावयाचा तलवारीचे वार करून खून केल्या प्रकरणी पोलीसांनी ४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून ३ जणांना तातडीने अटक केली आहे. मयूर आकाश काळे(वय २८)असे मृत जावयाचे नाव आहे. या प्रकरणी मृताची पत्नी मोनिका काळे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सचिन काळे, सूरज काळे व बुंदी भोसले अशी पोलीसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. या प्रकरणातील एक आरोपी संदीप काळे मात्र फरार झाला आहे. दारूच्या नशेत असलेल्या आरोपींनी मृत मयूर काळे व त्याची पत्नी मोनिका यांच्याकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली. दोघांनी नकार दिल्याने त्यांच्यात जोरदार वाद सुरू झाले. या दरम्यान आरोपींनी तलवार,लोखंडी पाईप व दगडाने आकाश काळे याला प्रचंड मारहाण केली. या मारहाणीत मयूर काळे याचा जागीच मृत्यू झाला. त्याला सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या मोनिका काळे यांनाही जबर मार लागला आहे. दरम्यान मयूर याचा भाऊ तैमूर मध्ये पडला असता आरोपींनी त्या घर पेटवून दिले.अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ. दीपाली काळे,उपनिरीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मसूद खान यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहाणी केली.