सोनई-घोडेगाव रस्त्यासाठी 6 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर

उद्योगमंत्री सुभाष देसाई व शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत होणार भूमिपूजन.

    सोनई / नवराष्ट्र न्युज नेटवर्क : नेवासा तालुक्यातील सोनई-घोडेगाव या रस्त्याच्या रुंदीकरण कामासाठी मंत्री शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नाने 6 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरणाचे काम या माध्यमातून होणार आहे

    या कामाचे भूमिपूजन शुक्रवार (दि. 3) सायंकाळी 5 वाजता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे शुभहस्ते व मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली घोडेगाव येथे संपन्न होणार आहे. हा रस्ता 8 किमी 300 मी लांबीचा असून, डांबरीकरण कारपेट सिलकोटसह होणार आहे.

    ओढ्या-नाल्यावर स्लॅब कल्व्हर्ट (छोटे पूल) करण्यात येणार आहे. यामुळे शनी शिंगणापूर येणारे भाविक, पर्यटकांना, स्थानिक व्यवसायिक व शेतकऱ्यांना मोठी उपलब्धता निर्माण होईल. तसेच घोडेगाव व सोनई परिसरातील नागरिकांची दळणवळणाची गैरसोय दूर होणार आहे.