नागापूर एमआयडीसीमधील वाईन्सचे दुकान फोडले; सहा लाखांसह चोरट्यांचा मद्यावर डल्ला

एमआयडीसीतील नागापूर येथील राहुल वाईन्स रात्री फोडण्यात आले आहे. यावेळी ६ लाख रूपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.

    अहमदनगर : एमआयडीसीतील नागापूर येथील राहुल वाईन्स रात्री फोडण्यात आले आहे. यावेळी ६ लाख रूपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. तर मद्याचे अनेक बॉक्स चोरून नेले आहेत.

    एमआयडीसी पोलीस घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले असून, पंचनामा करण्यात येत आहे. सन फार्मा कंपनी चौकात समोरच असलेल्या भररस्त्यावरील दारूचे दुकान फोडल्याने उद्योजकांमध्ये चितेंचे वातावरण आहे. त्यामुळे या चोरीचा तातडीने तपास लावण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.