9900 children infected with corona; Anxiety about the third wave increased

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असल्याची शक्यता व्यक्त तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. राज्यात लॉकडाऊन वाढविला असला तरी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तथापि गेल्या मे महिन्यात राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये एकूण 9900 बालकांनाही कोरोना झाल्याची पुष्टी झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तथापि, यापैकी 95 टक्के बालकांमध्ये संक्रमणाची अधिक लक्षणे नव्हती आणि त्यांची स्थितीही चिंताजनक नव्हती, असे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

    अहमदनगर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असल्याची शक्यता व्यक्त तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. राज्यात लॉकडाऊन वाढविला असला तरी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तथापि गेल्या मे महिन्यात राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये एकूण 9900 बालकांनाही कोरोना झाल्याची पुष्टी झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तथापि, यापैकी 95 टक्के बालकांमध्ये संक्रमणाची अधिक लक्षणे नव्हती आणि त्यांची स्थितीही चिंताजनक नव्हती, असे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

    मे महिन्यात अहमदनगरमध्ये एकण 86182 बाधितांची नोंद झाली होती. ज्या 9928 अल्पवयीनांना बाधा झाली होती त्यापैकी 6700 जण 11 ते 18 वयोगटातील तर 3100 एक ते दहा या वयोगटातील आणि काही एक वर्षापेक्षाही कमी वयोगटातील आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहू जाता त्यांची अधिक काळजी घेतली जात असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.

    बालरोग तज्ज्ञ समितीचे (टास्क फोर्स) सदस्य डॉ. सचिन सोलाट यांनीही स्थिती चिंताजनक नसल्याचे स्पष्ट केले. जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या 350 ते 370 रुग्णांमध्ये पाच ते सहा मुलांचा समावेश असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान ही अधिकांश बालकांना कोरोनाबाधा ही त्यांचे पालक वा कुटुंबातील अन्य सदस्यांमार्फतच झाली असल्याचा दावादेखील सोलाट यांनी केला.