A case has been registered against 6 persons, including a birthday boy, for laying eggs in front of the temple

जुन्नर : हल्ली वाढदिवस साजरा करण्याचा ट्रेंड बदलत आहे. बर्थ डे सेलिब्रेट करण्याच्या नावाखाली मंदिरासमोर एकमेकांना अंडी मारून धिंगाणा घालणाऱ्या बर्थ डे बॉयसह ६ जणांवर जुन्नरच्या नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे मुक्ताई मंदिरासमोर रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या धिंगाण्याचे व्हिडीओ देखील या तरुणांनी  सोशल मीडियावर शेअर केले. यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

सकलेन नासिर आतार, साकिर आमीन जमादार, आरमान खालीद शेख, मोईन एकलाक आतार, मोसीन फिरोज ईनामदार, जाहीद पिर महम्मद पटेल अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सकलेन नासिर आतार याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नारायणगावचे ग्रामदैवत मुक्ताई मंदिरासमोर सकलेनचे मित्र जमा झाले. यानंतर त्यांनी भर रस्त्यावरच सकलेनवर अंडी फेकण्यास सुरूवात केली. यावेळी मोठमोठ्याने आरडाओरड करत बीभत्स वर्तणूक केली. याचे व्हिडिओ शेअर झाल्यानंतर पोलिसांनी तात्काल याची दखल घेत सर्वांवर गुन्हा दाखल केला.