पुनतगाव येथील बेपत्ता युवक गळफास अवस्थेत सापडला

नेवासा पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार देखील नोंदविण्यात आली होती . गेल्या तीन दिवसांपासून त्याचा परिसरात शोध घेतला जात होता . मात्र घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या शेतातच फाशी घेतलेल्या व कुजलेल्यावअवस्थेत आढळून आला .शवविच्छेदनासाठी नेवासा फाटा येथिल ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला आहे.

    नेवासा : नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथे एका युवकाचा शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आज (शुक्रवारी )आढळुन आला.सुनील वामन पंडुरे ( वय २६ ) असे या युवकाचे नाव असून गेल्या बुधवारपासून हा युवक बेपत्ता होता.नेवासा पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार देखील नोंदविण्यात आली होती . गेल्या तीन दिवसांपासून त्याचा परिसरात शोध घेतला जात होता . मात्र घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या शेतातच फाशी घेतलेल्या व कुजलेल्यावअवस्थेत आढळून आला .शवविच्छेदनासाठी नेवासा फाटा येथिल ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला आहे.