सव्वा एकरातील डाळींब बाग जळाली

डाळींब बागेतील ठिबक सिंचन संच देखील जळून गेला. डाळींब बागेवरून वीजवाहक तारा गेलेल्या असून या तारांचे घर्षण होत ठिणग्या पडल्याने आग लागली असावी, अशी शक्यता तुकाराम दिघे यांनी व्यक्त केली. या आगीत डाळींब बाग जळून सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महसूल विभागाने जळालेल्या डाळींब बागेचा पंचनामा करावा, अशी मागणीही तळेगाव सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम तुळशीराम दिघे यांनी केली आहे.

    तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील हसनाबाद (तळेगाव दिघे) शिवारात अचानक आग लागून सव्वा एकर क्षेत्रातील सुमारे २०२ डाळींब झाडे आगीत जळाली. डाळींब बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी (दि. ८) दुपारी साडेच्या सुमारास ही घटना घडली. डाळींब बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यास मोठा आर्थिक फटका बसला.

    तळेगाव दिघे ते कोपरगाव रस्त्याच्या पश्चिमेला हसनाबाद (तळेगाव दिघे) शिवारात तळेगाव सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम तुळशीराम दिघे यांची शेतात वस्ती आहे. वस्तीनजीक हाकेच्या अंतरावर सव्वा एकर क्षेत्रात त्यांची डाळींब बाग आहे. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास डाळींब बागेला अचानक आग लागली. थोड्याच वेळात आग बागेत सर्वत्र पसरली. दरम्यान तुकाराम दिघे यांचा मुलगा अनिल दिघे यांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांच्यासह कुटुंबियांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग विझविण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. आगीत २०२ डाळींब झाडे जळाली. डाळींब बागेतील ठिबक सिंचन संच देखील जळून गेला. डाळींब बागेवरून वीजवाहक तारा गेलेल्या असून या तारांचे घर्षण होत ठिणग्या पडल्याने आग लागली असावी, अशी शक्यता तुकाराम दिघे यांनी व्यक्त केली. या आगीत डाळींब बाग जळून सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महसूल विभागाने जळालेल्या डाळींब बागेचा पंचनामा करावा, अशी मागणीही तळेगाव सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम तुळशीराम दिघे यांनी केली आहे.