रिक्षा झाली होती चोरी, पोलिसांकडे आली तक्रार अन् अवघ्या चोवीस तासांत…

मार्केटयार्ड परिसरातून चोरुन नेलेली ऍपे रिक्षा कोतवाली पोलीसांनी अवघ्या चोवीस तासात छडा लावला. संबंधित रिक्षा हस्तगत करून या प्रकरणी एका आरोपीला अटक केली.

    नगर तालुका : मार्केटयार्ड परिसरातून चोरुन नेलेली ऍपे रिक्षा कोतवाली पोलीसांनी अवघ्या चोवीस तासात छडा लावला. संबंधित रिक्षा हस्तगत करून या प्रकरणी एका आरोपीला अटक केली. सूरज दिलीप नरवडे (वय 26, रा.तपोवन रोड, कोल्हेश्‍वरी नगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
    निलेश शिंदे (रा. भोसले आखाडा) हे कष्टाची भाकरी केंद्रातील त्यांचे काम आटोपल्यावर त्यांची पॅगो रिक्षा (एम. एच. 16 व्ही 1994) ही कष्टाची भाकरी केंद्रासमोर मार्केटयार्ड येथे लॉक करुन हॉटेलमध्ये झोपण्यासाठी गेले होते. शिंदे यांची ऍपे रिक्षा कोणीतरी अज्ञात चोरट्याने तिथे हॅन्डल लॉक तोडून चोरून नेली होती. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
    कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांनी तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी काही सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. ही चोरीची रिक्षा वांबोरी (ता. राहुरी) येथे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मानगांवकर यांना मिळाली. गुन्हे शोध पथकाने वांबोरी येथे जाऊन सदर रिक्षेचा शोध घेतला असता, ती बेवारस स्थितीत आढळून आली.
    पोलिसांनी या घटनेतील आरोपीस नगर येथे आयुर्वेद कॉलेजच्या कॉर्नरजवळ पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने रिक्षा चोरल्याचे कबूल केले.
    पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलिस नाईक नितीन गाडगे, शरद गायकवाड, शाहीद शेख, बंडू भागदत, भारत इंगळे, योगेश भिंगारदिवे, सुमित गवळी, अभय कदम, दीपक रोहोकले, सुशिल वाघेला, सुजय हिवाळे, तान्हाजी पवार, प्रमोद लहारे, सोमनाथ राऊत आदींच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीविरुध्द यापूर्वी कोतवाली, तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.