Aditi Tatkare Meet Anna Hajare

मंदिरे सुरू करा अन्यथा जेलभरो आंदोलन करू, असा इशारा समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिलेले असतानाच राज्याच्या उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी राळेगणसिद्धीत जाऊन त्यांची भेट घेतली. तटकरे यांनी अण्णांशी प्रदीर्घ चर्चा केली.

    राळेगणसिद्धी : मंदिरे सुरू करा अन्यथा जेलभरो आंदोलन करू, असा इशारा समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिलेले असतानाच राज्याच्या उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी राळेगणसिद्धीत जाऊन त्यांची भेट घेतली. तटकरे यांनी अण्णांशी प्रदीर्घ चर्चा केली.

    यावेळी पारनेरचे आमदार निलेश लंके, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके हे देखील उपस्थित होते. आमदार झाल्यापासून अण्णांची भेट घ्यायची होती. मात्र कोरोनामुळे ते शक्य झालें नव्हते. त्यामुळे अहमदनगरमध्ये आल्यावर अण्णांची सदिच्छा भेट घेतल्याचे तटकरे यांनी सांगितले.

    यावेळी आदिती यांनी अण्णांना कोरोनाची परिस्थितीही समजावून सांगितली. मात्र, अण्णांनी आंदोलन मागे घेण्याबाबतचे कोणतेही ठोस आश्वासन दिले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे अण्णाचे आंदोलन होणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अण्णांच्या तब्येतीची विचारपूस करून विविध विषयांवर चर्चा केल्याचे तटकरे यांनी सांगितले. अण्णांना भेटून एक चांगली प्रेरणा मिळाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.