saibaba

दीप्ती सोनी असे या महिलेचे नाव आहे. इंदूर येथील साईभक्त मनोज सोनी १० ऑगस्ट २०१७ रोजी आपली मुले आणि पत्नी दीप्ती यांच्यासोबत शिर्डीला आले होते. यावेळी दीप्ती सोनी शिर्डीतून रहस्यमयरित्या गायब झाल्या होत्या. यांनतर त्यांचे पती मनोज सोनी यांनी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर बरेच दिवस झाले तरी दीप्ती सापडल्या नाहीत. मनोज सोनी यांचा पोलिसांकडे पाठपुरावा सुरूच होता.

शिर्डी : तीन वर्षांपूर्वी साईच्या शिर्डीतून अचानक बेपत्ता झालेली एक महिला सापडली आहे.  तिच्या मूळ शहरात अर्थात मध्य प्रदेशच्या इंदूरमध्येच ती आढळली आहे. त्यांच्या सर्व कुटुंबियांनी चौकशीसाठी शिर्डीला आणण्यात आले आहे.

दीप्ती सोनी असे या महिलेचे नाव आहे. इंदूर येथील साईभक्त मनोज सोनी १० ऑगस्ट २०१७ रोजी आपली मुले आणि पत्नी दीप्ती यांच्यासोबत शिर्डीला आले होते. यावेळी दीप्ती सोनी शिर्डीतून रहस्यमयरित्या गायब झाल्या होत्या. यांनतर त्यांचे पती मनोज सोनी यांनी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर बरेच दिवस झाले तरी दीप्ती सापडल्या नाहीत. मनोज सोनी यांचा पोलिसांकडे पाठपुरावा सुरूच होता.

महाराष्ट्र पोलिसांच्या एका टीमला दीप्ती या  इंदूरमध्ये आपल्या बहिणीच्या घराजवळ आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. त्यांची मानसिक स्थिती योग्य नसल्याने त्या कोणतीही माहिती देण्यास असमर्थ असल्याचे पोलिसांनी सांगीतले. गेल्या तीन वर्षांपासून त्या कुठे होत्या? त्या इंदूरला कशा पोहचल्या? अशा अनेक प्रश्नांची उत्तरले अजून पोलिसांना मिळालेली नाहीत. या प्रकरणी पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

दरम्यान, मधल्या काळात त्यांनी शिर्डीतून हरवलेल्या व पुन्हा सापडलेल्या व्यक्तींची अहवाल माहिती अधिकारात समोर आला. त्या आधारे मनोज यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. यावर सुनावणी घेताना शिर्डीतून मानवी तस्करी होते का, असा मुद्दा उपस्थित झाला. यासंबंधी तपास करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच गाजले.

पोलिसांनी केलेल्या तपासाविषयी उच्च न्यायालयाने नाराजीही व्यक्त केली होती. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा एकदा यासाठी मोहीम हाती घेतली होती.