कारच्या धडकेत बोअरवेल गाडीवरील मजूर जागीच ठार

भगवान सदाशिव चौकल्ले वय वर्षे (५५ रा. लोहा ता.लोहा जि.नांदेड) हे बोअरवेलच्या गाडीवर मजूर म्हणून काम करत होते शुक्रवारी पहाटे संगमनेर येथून बोअरवेलची गाडी साकूर फाटा मार्गे रणखांब कडे जात असताना ही गाडी रणखांब ते कौठे मलकापूर रोडवर आली होती

    संगमनेर : संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील रणखांब शिवारातील रणखांब ते कौठे मलकापूर रोडवर कारने एका जणास जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवार दिनांक १९ मार्च रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली आहे.

    याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की भगवान सदाशिव चौकल्ले वय वर्षे (५५ रा. लोहा ता.लोहा जि.नांदेड) हे बोअरवेलच्या गाडीवर मजूर म्हणून काम करत होते शुक्रवारी पहाटे संगमनेर येथून बोअरवेलची गाडी साकूर फाटा मार्गे रणखांब कडे जात असताना ही गाडी रणखांब ते कौठे मलकापूर रोडवर आली होती त्याच दरम्यान गाडी रोडच्या कडेला थांबली आणि भगवान चौकल्ले हे गाडीच्या खाली उतरून रोडच्या कडेला लघुशंका करत असताना त्याच दरम्यान कार क्रमांक एमएच १७ एजे -३४८१) हीच्यावरील अनोळखी चालक याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून कार भरधाव वेगात चालवून भगवान सदाशिव चौकल्ले यांना जोराची धडक दिली त्यामुळे चौकल्ले हे जागीच ठार झाले.

    या प्रकरणी मनमथ बाबुराव वड्डे रा. देवनीवाडी ता.लोहा जि.नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी कार चालका विरूद्ध गुन्हा रजिस्टर ६५ / २०२१ भादवी कलम ३०४ ( अ) २७९. मो.वा.का.क १८४,१३४ ( अ) (ब ) १७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस हेडकाॅन्सटेबल सुरेश टकले हे करत आहे.