…म्हणून तरुणांनी स्वत: खड्ड्यात गाडून घेऊन केले आंदोलन

    राहुरी : नगर-मनमाड महामार्गावरचे खड्डे बुजवण्यासाठी रस्ता दुरूस्ती कृती समितीच्या वतीने तरूणांनी स्वतः खड्ड्यात गाडून घेऊन अनोखे आंदोलन केले. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शनिवारी शिवाजीनगर येथे हे आदोलन छेडण्यात आले.

    संध्यानगर मनमाड महामार्गावर प्रवास करणे अवघड झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून दुरुस्तीसाठी लढा सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या मार्च महिन्यात काम सुरु होणार होते. परंतु, दुर्दैवाने काम चालू झाले नाही. नगर मनमाड खड्ड्यात अनेक अपघात झाले. या अपघातात अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. आंदोलन हाती घेतल्यानंतर प्रशासनाने मातीमिश्रीत खडीने खड्डे बुजविण्याचे सुरू केले आहे. परंतु, अवघ्या एकाच दिवसात खड्डे ‘जैसे थे’ झाले आहे. आता या आंदोलनाची दखल न घेतल्यास लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा वसंत कदम तसेच देवेंद्र लांबे यांनी दिला आहे.

    आंदोलकांना खड्ड्यात गाडून घ्यावे लागले तरी शासनाला जाग येत नाही. प्राजक्त तनपुरे, खासदार सुजय विखे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा. आता खड्ड्यात गाडून घेतले. यापुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी दिला.

    शनिवारी नगर-मनमाड राज्य महामायाप्रसंगी देवेंद्र लांबे, वसंत कदम, हसन सय्यद, प्रमोद विधाटे, सोनू साळुंके, राजेंद्र साळुंके, संजय वाणी, गोटूराम वाणी, सुयोग सिनारे, मयूर मोरे, नशीब पठाण, अमोल वाळुंज, श्रीकांत शर्मा, सचिन तारडे, तुषार कदम, प्रसाद कदम यांच्यासह इतर कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.