छापेमारीच्या कारवाईबाबत आमदार रोहित पवार म्हणतात…

उत्तर प्रदेश येथील घटना निषेधार्थ असून, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना तेथे अशी वागणूक मिळत असेल तर त्याला विरोध म्हणून महाविकास आघाडी सरकारमधील सर्व पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन ११ तारखेला बंद पुकारला आहे. तेथे असणाऱ्या शेतकरी त्यांचे मुले, मुली व शेतीशी निगडित असलेले लोक प्रतिसाद देतील.

    जामखेड : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महाविकास अघाडीला मिळालेले यश व दुसऱ्याच दिवशी आयकर विभागाने केलेली कारवाई हा योगायोग की निवडणुकीचा परिणाम याचे लागेबांधे आहे का हे तपासवे लागेल. राजकीय हेतूने ही कारवाई होत असेल तर ही कारवाई योग्य नाही, असे मत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी चौंडी येथे व्यक्त केले.
    आयकर विभागानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित पाच साखर कारखान्यांवर आणि बारामतीमधील एका व्यक्तीच्या घरी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईला अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दुजोरा दिला आहे. याबाबत रोहित पवार हे तालुक्यातील मंदिरे उघडली असल्याने चौडी येथील मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
    पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी राज्यातील सर्व धार्मिकस्थळे उघडत आहे. त्यामुळे आनंद होत असून, एक वेगळे वातावरण आजच्या दिवशी आहे. नवरात्रीच्या शुभेच्छा देऊन लोकांनी जास्तीत जास्त लसीकरण करून सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणूक लागल्या व त्यात महाविकास आघाडी सरकारला यश मिळाले व दुसऱ्याच दिवशी अशा पध्दतीने आयकर खात्याने कारवाई केली. यामध्ये कालच्या निवडणुकीचा निकाल आणि या कारवाईचे काही रिलेशन आहे का हे पहावे लागेल. पण जर राजकीय हेतूने अशा गोष्टी होत असतील तर लोकांना याचा कंटाळा आला आहे. या रेडच्या बाबतीत व या विषयाच्या अजून खोलात जाऊन माहिती घ्यावी लागेल पण अशा पध्दतीने वागणूक योग्य नाही, असे माझे व सर्वसामान्य लोकांचे म्हणणे आहे.
    उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न होऊन व सात जणांचा मृत्यू झाला ही घटना असंवैधनिक आहे. शेतकरी हा शेतकरी असतो. तो महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातचा असो की बिहारचा जेव्हा आपण एका मंदिरामध्ये नतमस्तक होतो, तो तालुक्यातील असो की बाहेरचा त्याचप्रमाणे शेतकऱ्याला वागणूक असावी.
    उत्तर प्रदेश येथील घटना निषेधार्थ असून, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना तेथे अशी वागणूक मिळत असेल तर त्याला विरोध म्हणून महाविकास आघाडी सरकारमधील सर्व पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन ११ तारखेला बंद पुकारला आहे. तेथे असणाऱ्या शेतकरी त्यांचे मुले, मुली व शेतीशी निगडित असलेले लोक प्रतिसाद देतील. त्यात कोणते राजकारण न समजता फक्त आपल्या युपीतील शेतकऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा विरोध म्हणून बंद पुकारला आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळेल, अशी आशा व्यक्त केली.
    यावेळी प्रा. मधुकर अबा राळेभात, दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, अक्षय शिंदे, सरपंच सुनिल उबाळे, प्रविण उगले, गणेश उबाळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.