पेट्रोल ,डिझेल ,गॅस दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेसचे ‘विश्वासघात’ आंदोलन 

केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे - आ.डॉ.तांबे

    संगमनेर : सर्वसामान्य जनतेला भूलथापा देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलची भरमसाठ दरवाढ केली आहे. याचा तीव्र निषेध देशातील जनता करत असून हे सरकार विश्वासघाताने सत्तेवर आले आहे अशी टीका नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ.डॉ. सुधीर तांबे यांनी केली असून युवक काँग्रेसच्या वतीने बुधवार दिनांक १७ फेेेब्रुवारी रोजी  मोदी सरकारच्या विरोधात हाय – हाय च्या घोषणा देत भाववाढीचा तीव्र निषेध करण्यात आला

    संगमनेर दिल्ली नाका येथे युवक काँग्रेस, एनएसयूआयच्या वतीने केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल व गॅस वाढीच्या निषेधार्थ विश्वासघात आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे तालुकाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, युवक शहराध्यक्ष निखिल पापडेजा , सुभाष सांगळे, गौरव डोंगरे, आनंद वर्पे, शेखर सोसे, ऋतिक राऊत, मनिष राक्षे ,प्रा. बाबा खरात, गोपी जहागिरदार, लाला मुनीम खान, अक्षय दिघे ,रमेश दिघे, नितीन अभंग, विजय उदावंत, शैलेश कलंत्री, नितीन सांगळे, बाळासाहेब कानवडे, सुमित वाघमारे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

    केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल व भाववाढी विरोधात युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर विश्वासघात आंदोलन करण्यात आले. या अंतर्गत संगमनेर मध्ये तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने विश्वासघात आंदोलन संपन्न झाले. यावेळी मोदी सरकारच्या धोरणाविरोधात व केंद्र सरकार विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने घोषणा देण्यात आल्या

    याप्रसंगी आ. डॉ. तांबे म्हणाले की, भाजप सरकारने भारतातील जनतेचा पूर्णपणे विश्वास घात केला आहे. अच्छे दिनचे चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या सरकारने फक्त जनतेला फसवले आहे. अफवा पसरवणे व खोटे बोलले ही भाजपा सरकारची सर्वात मोठी ताकद आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेत होते त्यावेळेस भाजपाच्या लोकांनी हे सरकार खूप भाव वाढ करत आहे म्हणून आंदोलने केली मात्र त्या काळात अजिबात भाव वाढ होत नव्हती. मागील सहा वर्षात भरमसाठ भाव वाढ झाली आहे. पेट्रोलचे भाव शंभरी पार झाली आहे लोकांना फसवून भूलथापा देऊन काँग्रेसवर केलेल्या घोटाळ्यांचे आरोप हे सरकार सहा वर्षात एकदाही सिद्ध करू शकले नाही. याचा अर्थ काँग्रेसने काही घोटाळा केलाच नव्हता मात्र भाजपाने बनवाबनवी केली आता जनतेवर भाऊ वाढीचा बोजा लादला आहे. अच्छे दिन सोडा संपूर्ण गोरगरिबांसाठी बुरे दिन सुरू झाली आहे अच्छे दिन फक्त भांडवलदार व श्रीमंतांचे असल्याची टीका आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली  यावेळी या आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .