महसूल मंत्र्यांच्या घरासमोर बहीणच आंदोलनाला बसली; मराठा आरक्षणासाठी आग्रही

Maratha kranti morcha: मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या शनिवारी (२६ सप्टेंबर) नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले.

संगमनेर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Cgress State President), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्या संगमनेर (Sangamner) येथील निवासस्थानासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) वतीने आंदोलनाला सुरूवात झाली आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या शनिवारी (२६ सप्टेंबर) नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी २ ऑक्टोबरला खासदार, आमदार यांच्या घरासमोर निर्देशने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

महसूलमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या शिवाजीनगर येथील घरासमोर ठिया आंदोलन करण्यात येते आहे. या आंदोलनात महसूल मंत्री थोरात यांच्या भगिनी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, त्यांचे पती आमदार डॉ. सुधीर तांबे हे देखील सहभागी झाले आहेत.