सातवा वेतन आयोगासाठी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन

अहमदनगर : कृषि विद्यापीठातील अधिकारी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाणे लागू करण्यासाठी आणि १०/२०/३० वर्षानंतर अनुज्ञेय ठरणारी तीन लाभांच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना लागू करण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरातील समन्वय संघाचे सर्व पदाधिकारी, सर्व अधिकारी व कर्मचारी, यांनी एकत्र येत सामाजिक आंतर राखून प्रशासकीय इमारतीच्या बाहेर आंदोलन आज करण्यात आले.

७ वा वेतन आयोग तातडीने लागू करण्याची मागणी
अहमदनगर : कृषि विद्यापीठातील अधिकारी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाणे लागू करण्यासाठी आणि १०/२०/३० वर्षानंतर अनुज्ञेय ठरणारी तीन लाभांच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना लागू करण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरातील समन्वय संघाचे सर्व पदाधिकारी, सर्व अधिकारी व कर्मचारी, यांनी एकत्र येत सामाजिक आंतर राखून प्रशासकीय इमारतीच्या बाहेर आंदोलन आज करण्यात आले. यावेळी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. विद्यापीठाचे कुलसचिव मोहन वाघ यांना सातव्या वेतन आयोगाच्या मागणी संदर्भात निवेदन विद्यापीठ समन्वय संघाचेवतीने देण्यात आले. आज केलेल्या आंदोलनानंतर आंदोलकांनी विद्यापीठ परिसरात दुपारी श्रमदान केले. आजपासून २ नोव्हेंबरपर्यंत सर्व अधिकारी व कर्मचारी काळ्याफिती लावून कामकाज करणार आहेत. यावेळी कुलसचिव मोहन वाघ यांनी सांगितले की, चारही कृषि विद्यापीठाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात येत्या दोन-तीन दिवसात शासनाकडून महत्वाचा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. विद्यापीठातील कर्मचार्‍यांच्या इतरही काही मागण्या असतील तर त्यावर तोडगा काढण्यासंदर्भात लवकरच दर महिन्याला ठराविक दिवशी कर्मचारी दरबार भरविण्याचे सुतोवाच त्यांनी यावेळी केले.

– शासनाने लवकर निर्णय घ्यावा
डॉ. उत्तम कदम म्हणाले की, कर्मचार्‍यांना आश्वासित प्रगती योजना लागु होणे महत्वाचे असून वर्षानुवर्ष पदोन्नती अभावी एकाच पदावर राहणार्‍या वर्ग तीन व चारच्या कर्मचार्‍यांना यामुळे फायदा होईल. आमच्या वेतन आयोगाच्या मागणीसंदर्भात शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा.