Although elections were held for the first time after 30 years, Popatrao Pawar is still in power in Hivrebazar Gram Panchayat

३० वर्षांनंतर पहिल्यांदाच निवडणुक झाली तरी हिवरेबाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवार यांचीच सत्ता आली आहे. हिवरेबाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवारांच्या पॅनेलची हवा आहे. या पॅनलने ७-० ने विजय मिळवला आहे. सातही जागांवर पोपटराव पवार यांचं पॅनल विजयी झाले आहे. हिवरेबाजार अहमदनगर जिल्ह्यातील आदर्शगाव आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांच्यामुळे १९९० पासून गावात बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरू झाली. तेव्हापासून हे गाव कधीच निवडणुकीला सामोरे गेले नाही. मात्र, यंदा प्रथमच गावकरी निवडणुकीला सामोरे गेले.

अहमदनगर : ३० वर्षांनंतर पहिल्यांदाच निवडणुक झाली तरी हिवरेबाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवार यांचीच सत्ता आली आहे. हिवरेबाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवारांच्या पॅनेलची हवा आहे.

या पॅनलने ७-० ने विजय मिळवला आहे. सातही जागांवर पोपटराव पवार यांचं पॅनल विजयी झाले आहे.

हिवरेबाजार अहमदनगर जिल्ह्यातील आदर्शगाव आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांच्यामुळे १९९० पासून गावात बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरू झाली. तेव्हापासून हे गाव कधीच निवडणुकीला सामोरे गेले नाही. मात्र, यंदा प्रथमच गावकरी निवडणुकीला सामोरे गेले.