अन् आ. रोहित पवार यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत केली नुकसानग्रस्त भागाची पहाणी

काल  दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी जातेगावं दिघोळ मोहरी तलाव येथे जलपूजन, यानंतर तेलंगशी तलाव जलपूजन, व नायगांव तलाव जलपूजन होणार होते पण जोरदार पावसामुळे वस्ती व तलावापर्यंन्त गाड्या जाणार नाहीत त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत शेतकर्‍यांच्या बांधावर पोहचले संवाद साधला व नुकसानीची पाहणी केली आमदार रोहित दादा स्वत टॅक्टर चालवत आहेत.

    जामखेड : तालुक्यातील पुरपरिस्थितीची व नुकसानीची पाहणी करण्यासाठी व काही तलावांचे जलपुजन करण्यासाठी आज आमदार रोहित पवार तालुक्यातील नायगाव येथे तलावाचे जलपूजन करण्यासाठी आणि अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी स्वतः ट्रॅक्टर चालवत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचले व शेतकर्‍यांशी संवाद साधला व अडीअडचणी जाणून घेतल्या.

    काल  दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी जातेगावं दिघोळ मोहरी तलाव येथे जलपूजन, यानंतर तेलंगशी तलाव जलपूजन, व नायगांव तलाव जलपूजन होणार होते पण जोरदार पावसामुळे वस्ती व तलावापर्यंन्त गाड्या जाणार नाहीत त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत शेतकर्‍यांच्या बांधावर पोहचले संवाद साधला व नुकसानीची पाहणी केली आमदार रोहित दादा स्वत टॅक्टर चालवत आहेत. हे पाहून नागरिकांना आश्चर्य वाटले व मोठे कुतुहल वाटले.

    यानंतर बांधखडक नदी खोलीकरण पाहणी केली व भूतवडा व काझेवाडी तलाव जलपूजन करून पाहणी केली यानंतर कुसडगाव येथील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. तसेच आमदार रोहित पवार यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवत शेतकर्‍यांशी संवाद साधला.