संतप्त शेतकर्‍यांची साकूर महावितरणवर धडक; खंडीत होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

 हिवरगाव पठार, शेंडेवाडी व परिसरात मागील दोन दिवसापासून शेतीपंपांचा वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. त्यामुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान होत आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी साकूरचे महावितरण कार्यालय गाठून वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याची मागणी केली.

    संगमनेर: हिवरगाव पठार, शेंडेवाडीसह परिसरातील शेतीपंपांचा वीज पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून वारंवार खंडीत होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट साकूर महावितरणचे कार्यालय गाठले. आणि वीज पुरवठा तातडीने सुरळीत करा अन्यथा दोन दिवसांनंतर कार्यालयासमोर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत हिवरगाव पठार, शेंडेवाडी ग्रामस्थांच्यावतीने महावितरणला निवेदन देण्यात आले.

    हिवरगाव पठार, शेंडेवाडी व परिसरात मागील दोन दिवसापासून शेतीपंपांचा वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. त्यामुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान होत आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी साकूरचे महावितरण कार्यालय गाठून वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याची मागणी केली. अन्यथा दोन दिवसांनंतर साकूर महावितरण कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.यावेळी गजानन खाडे, भाऊसाहेब उगले, संतोष डोळझाके, जनार्दन नागरे, असीफ शेख, सुनील डोळझाके, देविदास नागरे, सोपान डोळझाके, पांडुरंग वामन, शिवाजी वामन, रावसाहेब वामन, नजीर सय्यद, अशोक डोळझाके, अशोक वामन, भरत वनवे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.