अण्णा हजारे दिल्लीत आंदोलन करणार, पण त्यासाठी आहे एकच अट..

केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दोनदा आंदोलन केले. मोदी सरकारने तर लेखी आश्वासनही दिले होते. मात्र तेदेखील पाळले नाही, असा आरोप करतानाच दिल्लीतील आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे अण्णा हजारेंनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर दिल्लीतील जंतरमंतर किंवा रामलीला मैदानावर जागा मिळाली, तर आपण आंदोलन करायला तयार असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलंय. दिल्लीत सुरु असणाऱ्या आदोंलनातील शेतकऱ्यांच्या मुलांनी अण्णा हजारेंची राळेगणसिद्धीत भेट घेतली. त्यावेळी अण्णांनी हे आश्वासन दिलं.

केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दोनदा आंदोलन केले. मोदी सरकारने तर लेखी आश्वासनही दिले होते. मात्र तेदेखील पाळले नाही, असा आरोप करतानाच दिल्लीतील आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे अण्णा हजारेंनी म्हटले आहे.

केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीबाबत केंद्र सरकारकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद येत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केलंय. पंतप्रधान मोदींविरोधात थाळीनाद आंदोलन करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय. येत्या २७ डिसेंबरला पंतप्रधान मोदी ‘मत की बात’ करणार असून त्यावेळी थाळीनाद करून देशभरातील शेतकऱ्यांनी आपला विरोध नोंदवावा, असं आवाहन शेतकऱ्यांनी केलंय.

उत्तर प्रदेशच्या गाजीपूर सीमेवर तर सरकारनं शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर जप्त करायला सुरुवात केलीय. जे शेतकरी ट्रॅक्टर घेऊन आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात आहेत, त्यांचे ट्रॅक्टर जप्त करण्यात येत आहेत. येत्या एका दिवसात ही कारवाई बंद केली नाही, तर दुसरी लेन रोखून धरण्याचा इशारा शेतकरी संघटनांकडून देण्यात आलाय.