ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा  जाहीर केल्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर भाजपचे माजी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार भागवत कराड आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णा हजारे यांनी भेट घेतली. महिनाभराहून अधिक काळ दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु आहे.

पारनेर (Parner).  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर भाजपचे माजी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार भागवत कराड आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णा हजारे यांनी भेट घेतली. महिनाभराहून अधिक काळ दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा हजारे यांनी इशारा दिल्यानंतर राळेगणसिद्धी येथे येऊन भाजप नेत्यांनी त्यांची भेट अण्णांसोबत चर्चा करून एक महिन्याची मुदत मागून अण्णांनी आंदोलन करू नये अशी विनंती देखील त्यांनी केली आहे. अण्णांनी मात्र केवळ अश्वासनावर ना थांबता शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर जानेवारी महिनाअखेर आयुष्यातील शेवटचे आंदोलन करण्याचा इशारा दिला.