इंदोरीकर महाराजांच्या ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी अंनिसचा हस्तक्षेप अर्ज न्यायालयाकडून मान्य

इंदोरीकर महाराज (Indorikar Maharaj) यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर (Sangamner) प्रथमवर्ग न्यायालयात फिर्याद दाखल केला आहे.

अहमदनगर : इंदोरीकर महाराज (Indorikar Maharaj) यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर (Sangamner) प्रथमवर्ग न्यायालयात फिर्याद दाखल केला आहे. अंनिसच्यावतीने (Annis)  या प्रकरणात दाखल करण्यात आलेला हस्तक्षेप अर्ज संगमनेर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. घुमरे (D. S. Ghumare) यांनी शुक्रवारी सुनावणीवेळी मान्य करत लेखी युक्तिवादाला परवानगी (Permission) दिली.

या वादग्रस्त विधानावरून त्यांच्याविरोधात संगमनेरच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर (Dr. Bhaskar Bhavar) यांनी १९ जून रोजी संगमनेर न्यायालयात फिर्याद दिली होती. तसेच ३ जुलै रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱी पी.डी. कोळेकर यांच्यासमोर कामकाज झाले होते. या प्रकरणात अंनिसच्यावतीने अँड. रंजना गवांदे यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. त्यावर काल शुक्रवारी सुनावणी झाली. तसेच अंनिसचा अर्ज न्यायालयाने मान्य केला असून पुढील सुनावणी २८ ऑक्टोंबर रोजी होणार आहे.