saibaba

राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानवाढ सुरू आहे. शिर्डीतदेखील उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे शिर्डीत साईदर्शनाच्या शुल्क आणि मोफत दर्शन पासेसचे सकाळी 11 ते 4 दरम्यान वितरण बंद राहणार आहे.

    शिर्डी : शिर्डीतील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी दररोज लाखो भाविक येत असतात. शिर्डी संस्थान साईभक्तांच्या सोई – सुविधेसाठी प्रयत्नशील असते. भाविकांना कोणत्याही तसदीविना साईदर्शन करता यावे यासाठी संस्थानाचा पुढाकार असतो. सध्या शिर्डीतील तापमानाचा विचार करता. शिर्डी साईबाबाबा संस्थानाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

    राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानवाढ सुरू आहे. शिर्डीतदेखील उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे शिर्डीत साईदर्शनाच्या शुल्क आणि मोफत दर्शन पासेसचे सकाळी 11 ते 4 दरम्यान वितरण बंद राहणार आहे.

    उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने साई भक्तांना सकाळी 6 ते 11 आणि सायंकाळी 4 ते 9:30 दरम्यान दर्शन पासेसचे वितरण केले जाणार आहे. पासेसच्या वितरण सुरू असताना साईभक्तांना दिवसभरातील कुठल्याही वेळेचा पास घेण्याची मुभा आहे.