कर्जत तालुका प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी प्रा. किशोर कांबळे, उपाध्यक्ष सोमनाथ गोडसे

कर्जत तालुका प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी प्रा. किशोर कांबळे, उपाध्यक्षपदी सोमनाथ गोडसे तर सचिवपदी अस्लम पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

कर्जत: कर्जत तालुका प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी प्रा. किशोर कांबळे, उपाध्यक्षपदी सोमनाथ गोडसे तर सचिवपदी अस्लम पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष प्रा. किरण जगताप यांच्या अध्यक्षतेखाली राशीन येथे ही बैठक झाली.

बैठकीत निवडलेली कार्यकारिणी
कार्याध्यक्ष- भाऊसाहेब तोरडमल, जिल्हा प्रतिनिधी किरण जगताप, महादेव सायकर, सहसचिव- योगेश गांगर्डे, खजिनदार- संतोष रणदिवे, सदस्य- विश्वास रेणुकर, विनायक चव्हाण,विनायक ढवळे, दादा शिंदे, मिलिंद राऊत, प्रेस फोटोग्राफर – शिरीश यादव, सुनिल शेटे, सुमित भैलुमे. या बैठकीत मागील वर्षीच्या कामकाजाचा आढावा घेऊन पुढील वर्षातील उपक्रम कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.