सक्रिय कार्यामुळेच बाबर यांच्यावर विविध पदांची जबाबदारी

अहमदनगर : रयत शिक्षण संस्थेचे कार्य मोठे आहे. रयतच्या कमवा व शिका या उपक्रमांतून अनेक नामवंतांनी शिक्षण घेऊन मोठे झाले आहे. जिल्ह्यातही रयत शिक्षण संस्थेच्या शाळा,महाविद्यालया मधून हजारो सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत आहे.शैक्षणिक क्षेत्रातील एका नामांकित संस्थेच्या समन्वय समितीच्या सदस्यपदी अशोक बाबर यांची निवड ही त्यांच्या चांगल्या कामाची पावती आहे.

अविनाश घुले यांचे प्रतिपादन
अहमदनगर : रयत शिक्षण संस्थेचे कार्य मोठे आहे. रयतच्या कमवा व शिका या उपक्रमांतून अनेक नामवंतांनी शिक्षण घेऊन मोठे झाले आहे. जिल्ह्यातही रयत शिक्षण संस्थेच्या शाळा,महाविद्यालया मधून हजारो सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत आहे.शैक्षणिक क्षेत्रातील एका नामांकित संस्थेच्या समन्वय समितीच्या सदस्यपदी अशोक बाबर यांची निवड ही त्यांच्या चांगल्या कामाची पावती आहे. सामाजिक, राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांचे सर्वच क्षेत्रातील सक्रिय कार्यामुळेच त्यांच्यावर विविध पदांची जबाबदारी पडत आहे,असे प्रतिपादन जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.
जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने रयत शिक्षण संस्थेच्या समन्वय समितीच्या सदस्यपदी अशोक बाबर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना जिल्हाध्यक्ष अविनाश घुले. उपाध्यक्ष गोविंदराव सांगळे,सचिव मधुकर केकाण,रंगनाथ खेंडके,संजय महापुरे,तबाजी कार्ले, बाबासाहेब वाळके,अर्जुन शिंदे आदि उपस्थित होते.सत्कारास उत्तर देतांना अशोक बाबर म्हणाले,प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे केले पाहिजे. आपल्या चांगल्या कामाची दखल ही घेतलीच जात असते. आपण विविध क्षेत्रात काम करतांना अनेक मित्र परिवाराच्या सहकार्याने काम करत आहोत. त्यामुळेच विविध पदांवर काम करण्याची संधी मिळते. रयत शिक्षण संस्थेच्या आदर्शवत कामात आपणही सहभागी झालो, याचा अभिमान आहे.