अहमदनगरहमध्ये तलाठी भरती परीक्षेत बनवाबनवी उघड; सीसीटीव्ही तपासात ११ तोतया उमेदवारांवर गुन्हा दाखल

अहमदनगर जिल्ह्यातील८४ तलाठी पदासाठी महापोर्टलमार्फत २ते २६ जुलै २०१९ दरम्यान ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर २३ डिसेंबर २०१९ रोजी १२५ जणांची प्रारुप यादी प्रशासनाने जाहीर केली. त्या उमेदवारांना ३ ते ७ जानेवारीदरम्यान कागदपत्रांच्या छाननीसाठी नगर जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आले. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पडताळणी केल्यानंतर उमेदवारांचे कागदपत्रावरील फोटो आणि प्रत्यक्षातील उमेदवार याबाबत संशय आल्याने परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. त्यात ११ तोतया उमेदवार आढळले.

    अहमदनगर: अहमदनगरमधील तलाठी भरती परीक्षेत बनवा बनवी झाल्याचे उघड झाले आहे. त्यानूसार आता ११ डमींवर अहमदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या तलाठी भरती परीक्षेला बनावट कागदपत्रांच्या आधारे डमी विद्यार्थी बसले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पडताळणी केल्यानंतर उमेदवारांचे कागदपत्रावरील फोटो आणि प्रत्यक्षातील उमेदवार याबाबत संशय आल्याने परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. त्यात ११ उमेदवार डमी आढळले.

    जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पडताळणीत संशय

    अहमदनगर जिल्ह्यातील८४ तलाठी पदासाठी महापोर्टलमार्फत २ते २६ जुलै २०१९ दरम्यान ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. तर उमेदवारांनी ही परीक्षा आपापल्या जिल्ह्यातून ऑनलाईन दिली. त्यानंतर २३ डिसेंबर २०१९ रोजी १२५ जणांची प्रारुप यादी प्रशासनाने जाहीर केली. त्या उमेदवारांना ३ ते ७ जानेवारीदरम्यान कागदपत्रांच्या छाननीसाठी नगर जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आले. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पडताळणी केल्यानंतर उमेदवारांचे कागदपत्रावरील फोटो आणि प्रत्यक्षातील उमेदवार याबाबत संशय आल्याने परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. त्यात ११ तोतया उमेदवार आढळले.

    मुलीच्या नावापुढे पुरूष असा उल्लेख

    अहमदनगरच्या जिल्हाधिकार्‍यांना कागदपत्रांमध्ये गडबड झाल्याचा संशय आल्याने त्यांनी चौकशी सुरु केली. समाधानकारक उत्तरे न मिळाल्यावर त्यांनी २३६ उमेदवारांचे सीसीटीव्ही फूटेज मागवले. तेही त्यांना महाआयटीकडून पूर्ण मिळाले नाहीत. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या सह्या जुळत नाहीत, एका मुलीच्या नावासमोर पुरूष असे लिहिले होते. नंतर तिने ही चूक असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले, यासारख्या बाबी त्यांना आढळल्या. त्यामुळे याप्रकरणातील संसय बळावल्याने चौकशी केली असता खरी माहिती उघड झाली आहे.