संगमनेरमध्ये बँक कर्मचाऱ्यांचा मोर्चा 

भारतीय स्टेट बँक, जाणता राजा मार्ग, संगमनेर शाखा येथे घोषणाबाजी करण्यात आली. शिस्तबद्धपणा हे या निदर्शनांचे ठळक वैशिष्ट होते. महिला कर्मचारी यांनी देखील या निदर्शनात सक्रिय सहभाग घेतला. AIBOC चे केंद्रीय समिती सदस्य श्री. सुधाकर जोशी यांनी सरकार ला जर या संपाने जाग येणार नसेल तर भविष्यात बेमुदत संप करून आणखी जोरदार निदर्शने करण्यात येतील असेही सांगितले.

    संगमनेर : बँकेच्या खाजगीकरणा विरोधात बँक कर्मचाऱ्यांची शिखर संघटना UFBU ने १५ व १६ मार्च २०२१ रोजी संपाची हाक दिली आहे. त्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी मंगळवार दिनांक १५ मार्च रोजी संगमनेर येथे संगमनेर शहर, तालुका, अकोले, राहाता, कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्यातील सर्व बँक कर्मचारी एकत्रित आले होते.

    भारतीय स्टेट बँक, जाणता राजा मार्ग, संगमनेर शाखा येथे घोषणाबाजी करण्यात आली. शिस्तबद्धपणा हे या निदर्शनांचे ठळक वैशिष्ट होते. महिला कर्मचारी यांनी देखील या निदर्शनात सक्रिय सहभाग घेतला. AIBOC चे केंद्रीय समिती सदस्य श्री. सुधाकर जोशी यांनी सरकार ला जर या संपाने जाग येणार नसेल तर भविष्यात बेमुदत संप करून आणखी जोरदार निदर्शने करण्यात येतील असेही सांगितले.

    या निदर्शनासाठी हर्षद पाबळकर, केंद्रीय समिती सदस्य NCBE, वैभव कदम, क्षेत्रीय सचिव SBIOA, अरविंद कचरे, सचिन कडलग, विजय डोंगरे, अनिरुद्ध मैड, महेश कात्रजकर, नितीन पांडे आदी विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. हर्षद पाबळकर यांनी सूत्रसंचालन केले तर सुधाकर देशपांडे यांनी आभार मानले तसेच बुधवार दिनांक १६ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता मेणबत्ती मोर्चा काढून सरकारचा निषेध नोंदवण्यात येईल असे श्री. सुधाकर जोशी यांनी जाहीर केले.