श्रीगोंदा कुकडीच्या पाण्यासाठी मोठी राजकीय किंमत मोजावी लागली : घनश्याम शेलार

  अहमदनगर : १९८६ सालापासून मी तालुक्याला पाणी मिळावे यासाठी संघर्ष करत आहे, कुकडीच्या धरणातील१२ टीएमसी पाणी कुठे गेले याचा जाब विचारला त्याची मला मोठी राजकीय किंमत मोजावी लागली. मी श्रेयासाठी काम करत नाही तर जनतेच्या हितासाठी माझी नेहमी धडपड असते. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष असताना पाण्यासाठी मी प्राणांतिक उपोषण केले, हंगा जलसेतुसाठी मी पाठपुरावा केला. कुकडी, घोडसाठी सतत संघर्ष केला, गाडीला भोंगा बांधून त्याबाबत जनजागृती केली, असे करून सुद्धा कुकडीच्या आवर्तनावरून माझ्यावर संशय कसा काय व्यक्त होतो, असा भावनिक सवाल करून याबाबत मला खंत वाटते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व कालवा सल्लागार समितीचे सदस्य घनश्याम शेलार यांनी दिली.

  शेलार यांनी आज श्रीगोंदयात त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते या पत्रकार परिषदेला संजय आनंदकर,राष्ट्रवादी शहराध्यक्ष भाऊसाहेब खेतमाळीस,फिरोज जकाते,मोहन भिंताडे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के,बाळासाहेब शेलार उपस्थित होते.

  श्रीगोंदा तालुक्यात आवर्तन सुरू झाल्यानंतर लगेचच कुकडीचे आवर्तन बंद झाले त्यावर बोलताना पाऊस थांबल्यामुळे आवर्तन थांबले,पाऊस पाडणे माझ्या हातात नाही २५ ऑगस्टला पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानंतर तात्काळ जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी बोलून माणिकडोह मधून एक टीएमसी पाणी काढल्यास आवर्तन होईल असे त्यांना सांगितले पण पुणे जिल्ह्यातील आमदारांनी भविष्यातील पाण्याची परिस्थिती लक्षात घेऊन माणिकडोह मधून पाणी काढण्यास विरोध केल्यामुळे आवर्तन होऊ शकले नाही असे शेलार यांनी सांगितले.

  सल्लागार समितीला अनेक सदस्य मग मी एकटाच जबाबदार कसा?

  त्या भागातले विधानसभा,विधानपरिषद आमदार,कारखाण्याचे चेअरमन, खासदार हे सर्व कालवा सल्लागार समितीचे सदस्य असतात मग आवर्तन बंद झाल्यावर त्याला मी एकटाच जबाबदार कसा? असा प्रश्न शेलार यांनी टीका करणाऱ्यांना उपस्थित केला.

  काम न करता श्रेय घेण्याची पाचपुतेना सवय, पाणी देण्याची जबाबदारी आमदार पाचपुते यांची काम न करता त्याच श्रेय घेण्याची पाचपुतेना सवय असून सोशल मिडियावरच्या श्रेयवादाच्या बातम्यांमुळे पाणी बंद होत असल्याचे सांगूनपाण्याच्या स्लोगणवर आमदार बबनराव पाचपुते यांना लोकांनी निवडून दिले राहुल जगताप आमदार असताना पाण्याची जबाबदारी ही आमदारांची असते असे पाचपुते सांगत होते आता पाचपुते आमदार आहेत मग त्यांनी पाण्याची जबाबदारी घ्यावी आमचं सरकार पाण्याच्या बाबतीत कोणताही हस्तक्षेप किंवा आडकाठी करत नाही असे शेलार यांनी स्पष्ट केले.

  डिंभे माणिकडोह बोगद्याबाबत पवारांशी बोलणार डिंभे धरणाचे पाणी आपल्याकडे घेणे गरजेचे आहे तरच आवर्तन व्यवस्थित होईल पण डिंभेचे डिझाईन चुकीचे आहे त्यामुळे डिंभे माणिकडोह बोगद्याबाबत आपण माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.

  बाळासाहेब नहाटा यांनी तालुक्यातील एका नेत्याने ग्यास पाईपलाईन ठेकेदाराकडे ५०लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप केला त्याबाबत शेलार यांना विचारले असता त्यांनी पुराव्यासह थेट नाव जाहीर करावं,जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी प्रतिक्रिया दिली.

  एमआयडीसी बाबत फक्त घोषणाबाजी,बनवाबनवी तालुक्यात एमआयडीसी होणार अशी घोषणा पाचपुते यांनी ४१वर्षांपूर्वी केली होती पण आजपर्यत ती फक्त घोषणाच राहिली ते पालकमंत्री असताना त्यांना एमआयडीसीचा साधा प्रस्ताव देखील पाठवला नाही ते त्या प्रश्नी फक्त पाचपुतेनी बनवाबनवी केली अशी टीका घनश्याम शेलार यांनी केली.

  तसेच कुकडीच्या पाण्यात तालुक्यातील नेत्यांचा होणारा हस्तक्षेप याचा देखील फटका आवर्तनात बसत आहे. तसेच तालुक्याला पाणी मिळण्याबाबत योग्य त्या सूचना कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मांडू, असेही शेलार यांनी सांगितले