आमदार निलेश लंके यांच्या जम्बो कोविड सेंटर जवळ भाजपा नेत्याने सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये विश्वशांती यज्ञ 

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील आमदार निलेश लंके यांच्या कोविड केअर सेंटरला भेट दिली. लंके यांच्या अत्याधुनिक अशा जम्बो कोविड सेंटरचे यावेळी त्यांनी कौतुक केले. लंके यांच्या कोविड सेंटर जवळच टाकली ढोकेश्वर इथे स्थानिक एका भाजपा नेत्याने सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये विश्वशांती यज्ञ केल्याच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी भाजपावर तोंडसूख घेतले.

    अहमदनगर : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील आमदार निलेश लंके यांच्या कोविड केअर सेंटरला भेट दिली. लंके यांच्या अत्याधुनिक अशा जम्बो कोविड सेंटरचे यावेळी त्यांनी कौतुक केले. लंके यांच्या कोविड सेंटर जवळच टाकली ढोकेश्वर इथे स्थानिक एका भाजपा नेत्याने सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये विश्वशांती यज्ञ केल्याच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी भाजपावर तोंडसूख घेतले.

    देशात भाजपाचे नेतृत्व कोविडचा मुकाबला करण्यात अपयशी ठरल्याचे सांगत गोमूत्र प्या, यज्ञ करा अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या गोष्टी करत असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेसारख्या अनेक देशांनी तेथील लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक मदत करून लस निर्मिती क्षमतेसाठी पुढाकार घेतला.

    भारतात मात्र केंद्र सरकारने या कडे दुर्लक्ष केले, आता परस्थिती बिकट झाल्यावर मदत केली जात आहे. मात्र यामुळे देशात सगळ्याच ठिकाणी लसींचा पुरवठा कमी असल्याची टीका त्यांनी केंद्र सरकरवर केली.