“सरकार पाडण्यासाठी भाजपचे अनेक प्रयत्न, पण आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही” – बाळासाहेब थोरात

दिल्लीतील पवार-मोदी भेटीवर बोलताना थोरात म्हणाले, “भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही तीन पक्ष एकत्र आलो आहोत. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील या दोन नेत्यांच्या भेटीचा महाविकास आघाडी सरकारवर काही परिणाम होणार नाही. मात्र, यामुळे आशा पल्लवित झाल्याने काही लोक राज्यातले सरकार कोसळावे, यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. दिवसा स्वप्ने पाहणाऱ्यांची स्वप्ने कधीही पूर्ण होणार नाहीत,’’ असा मिस्कील टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपला लगावला.

    येत्या महानगर पालिका निवडणूकीत काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज शिर्डी येथील हॉटेल पुष्पक येथे बैठक घेतली. यावेळी बोलताना मंत्री थोरात म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे, भारतीय जनता पक्षाचा कुठलाही डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.”

    दिल्लीतील पवार-मोदी भेटीवर बोलताना थोरात म्हणाले, “भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही तीन पक्ष एकत्र आलो आहोत. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील या दोन नेत्यांच्या भेटीचा महाविकास आघाडी सरकारवर काही परिणाम होणार नाही. मात्र, यामुळे आशा पल्लवित झाल्याने काही लोक राज्यातले सरकार कोसळावे, यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. दिवसा स्वप्ने पाहणाऱ्यांची स्वप्ने कधीही पूर्ण होणार नाहीत,’’ असा मिस्कील टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपला लगावला.

    याशिवाय कृषी कायदे रद्द करण्यासाठी आठ महिन्यांपासून लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. त्यांतील ५०० जणांनी हौतात्म्य पत्करले. ते कायदे रद्द होणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त देशाच्या सहकारी, अर्बन बँकावर निर्बंध आणणाऱ्या नवीन कायद्यामुळे रिझर्व्ह बँक या बँका ताब्यात घेईल, अशी परिस्थिती आहे.

    त्यावरही चर्चा करण्यासाठी ही भेट होणे आवश्यक होते. मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोकराव चव्हाण यांनीही भेटी घेतल्या होत्या. राष्ट्रीय पातळीवरील या दोन नेत्यांच्या दिल्लीत एक तास झालेल्या भेटीचा राज्यातील आघाडी सरकारवर काही परिणाम होणार नाही.’’ या सरकारने दोन वर्षे चांगले काम केले; पुढील तीन वर्षे हे सरकार चालणार असल्याचा ठाम विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. संगमनेर दूध संघावरील कार्यक्रमानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

    दरम्यान, पुन्हा एकदा देशात काँग्रेसची लाट येणार असल्याचा विश्वासही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थितांना दिला.