मिरजगावात रक्तदान शिबिराचे आयोजन

कर्जत : हिंदुहृदय प्रतिष्ठान ग्रुप मिरजगाव व जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर याच्या संयुक्त विद्यमानाने स्व. सुयोग (भाऊ) क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते, या शिबिरात ६५ इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या प्रतिष्ठाणच्या सदस्यांनी सांगितले की, यावर्षी कोरोना महामारीमुळे तसेच मिरजगावात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे रूग्णांना रक्ताची अवश्यकता भासत असून जिल्हात रक्ताचा तुडवडा असल्याने रक्तदान शिबिर घेण्याचे ठरवले. या शिबिरात सामाजिक अंतराचे सर्व नियम पाळत जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

यावेळी हिंदुहृदय प्रतिष्ठाणचे सदस्य अमोल देशमाने, विनय लिंगडे, रोहित जाधव, गणेश पलंगे, शुभम देशमाने, अक्षय माने, शुभम क्षीरसागर, युवराज माने, अरबाज बागवान,चिकू दातीर, नागेश खोटे, विश्‍वजित मोरे, संदेश क्षीरसागर, आकाश पोटे, महेश कोरडे, सूरज पोटे, संकेत देशमाने व इच्छुक रक्तदाते उपस्थित होते.