बूथ हॉस्पिटलने दवा देऊन दुवा मिळविल्या आहेत

नगरसेवक अविनाश घुले यांचे प्रतिपादन
अहमदनगर : गेल्या १०० वर्षांपासुन सुरु असलेली बुथ हॉस्पिटलची निरंतन आरोग्य सेवा आज कोरोनाच्या काळात नागरिकांना देवदूतासमान वाटत आहे. या जागतिक महामारीत नि:स्वार्थी सेवा देऊन एक प्रकारे नागरिकांना जीवनदानच दिले आहे. कोरोनाच्या काळात अनेकांनी आरोग्य सेवेचा व्यवसाय मांडला असतांनाही येथे रुग्णांची मोफत सेवा करुन मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे. येथील डॉक्टर्स, नर्स, कर्मचार्‍यांची सेवा भावी वृत्तीने नागरिकांना दवा देऊन त्यांच्या दुवा मिळविल्या आहेत. आज अशाप्रकारे इतर हॉस्पिटलनेही सेवा देऊन नागरिकांचे आशिर्वाद घेण्याची गरज आहे. बुथ हॉस्पिटलच्या या सेवाभावी कार्यात आपणही योगदान द्यावे, या हेतूने मदत ही छोटीशी मदत केली आहे. या भागाचा लोकप्रतिनिधी असल्याने मनपा संदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेऊ.यापुढील काळातही अशाच प्रकारचे सहकार्य केले जाईल,असे प्रतिपादन नगरसेवक तथा हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.
नगरसेवक तथा हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांच्यावतीने बूथ हॉस्पीटल येथे डस्टबीन व इतर साहित्य देण्यात आले. यावेळी बूथ हॉस्पीटलचे मेजर देवदान कळकुंभे,गणेश औटी,योगेश ठुबे,स्वप्नील घुले, अक्षय घुले,सागर नाईकवाडी, विकास दरेकर, बंटी कचरे, संस्कार दहिंडे, सचिन राऊत, युवराज राऊत आदि उपस्थित होते.

कळकुंभे म्हणाले, बुथ हॉस्पिटलचे सेवा कार्य हेच ब्रिद असल्याने येथे येणार्‍या प्रत्येकाला चांगली सेवा देऊन लवकर बरे केले जाते. डॉक्टर्स, नर्स व कर्मचार्‍यांची सेवाभावी वृत्तीमुळे रुग्ण हसतमुख घरी जातो. यासारखे कोणतेही समाधान नाही. या सेवा कार्यात अनेकांचे सहकार्य मिळत आहे ते आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. सर्वांच्या सहकार्याने आपण लवकरच कोरोनावर मात करुच. नागरिकांनीही स्वतः आपली परिवाराची काळजी घेणे सर्वात महत्वाचे आहे. गर्दी मध्ये जाणे टाळा,मास्क,सॅनिटायझर वापर केला पाहिजे. आरोग्य तपासणी करुन छोटे छोटे गोष्टीचे पालन जर केले तर आपण कोरोनाला हरवल्याशिवाय राहणार नाही.