प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कन्नड (जि . औरंगाबाद) येथील रहिवासी असलेले ऊसतोड कामगार व्यक्ती त्याच्या अपघातात मयत झालेल्या नातेवाईकाचा पीएम रिपोर्ट व पंचनामा ची प्रत घेण्यासाठी नेवासा पोलीस स्टेशन या ठिकाणी आले होते . पोलीस नाईक सोमनाथ कुंधारे याने तक्रारदार यांच्याकडे १६ मार्च रोजी पंधरा हजार रुपयांची मागणी केली.

    नेवासा : अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचा पीएम रिपोर्ट व पंचनामाची प्रत देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेतांना नेवासा पोलीस स्टेशनचा पोलीस नाईक सोमनाथ अशोक कुंधारे वय ३३ यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

    याबाबत अधिक माहिती अशी की, कन्नड (जि . औरंगाबाद) येथील रहिवासी असलेले ऊसतोड कामगार व्यक्ती त्याच्या अपघातात मयत झालेल्या नातेवाईकाचा पीएम रिपोर्ट व पंचनामा ची प्रत घेण्यासाठी नेवासा पोलीस स्टेशन या ठिकाणी आले होते . पोलीस नाईक सोमनाथ कुंधारे याने तक्रारदार यांच्याकडे १६ मार्च रोजी पंधरा हजार रुपयांची मागणी केली.तडजोडी अंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले .आज १७ मार्च रोजी नेवासा पोलीस स्टेशन येथे ही रक्कम स्वीकारली .याप्रकरणी सदर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.कॅश व्हॅल्यू व फोटोग्राफ घेण्यात आले आहेत . आरोपीकडून दहा हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली.सापळा अधिकारी म्हणून नाशिक लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक उज्वलकुमार व्ही पाटील , सह अधिकारी चंद्रसेन पालकर, पो.कॉ. दीपक कुशारे,पो.कॉ. सचिन गोसावी , पो.ना.एकनाथ बाविस्कर , चालक पो.शी.जाधव होते .