Crime

पल्लवी हिचे यापूर्वी तीन विवाह होऊनही तिच्या पहिल्या लग्नाची माहिती लपवून हिवाळे, जीजरे, वाघ या तिघा मध्यस्थींनी पल्लवीचे स्थळ कर्जत तालुक्यातील आखोणी गावातील तरुणाला सुचविले. त्या बदल्यात त्यांनी २ लाख रुपये घेतले.

    कर्जत : पैशाच्या मोहापायी लग्न लावयाचे, अन बाहणा करून पळ काढायचा. अशाच प्रकारे एक नवरी पळाली पण पोलिसांनी तिला शाेधून काढत गजाआड केले. तिच्यासोबतच मध्यस्थीही अटक केले असून त्यांच्याकडून ८० हजार रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

    राजु उर्फ राजेंद्र वैजनाथ हिवाळे (रा. माजलगाव, ता. जि. परभणी), विलास जीजरे (रा. हिंगोली, जि. हिंगोली), मंगलाबाई दत्तराव वाघ (रा. पोखणी, ता. जि. परभणी), पल्लवी गोमाज सगट (वय २०, रा. मोहाला, ता. सोनपेठ, जि. परणी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहते. पल्लवी हिचे यापूर्वी तीन विवाह होऊनही तिच्या पहिल्या लग्नाची माहिती लपवून हिवाळे, जीजरे, वाघ या तिघा मध्यस्थींनी पल्लवीचे स्थळ कर्जत तालुक्यातील आखोणी गावातील तरुणाला सुचविले. त्या बदल्यात त्यांनी २ लाख रुपये घेतले. वरतल खर्चासाठी आणखी १० हजार उकळले. लग्नानंतर पल्लवीने पळ काढला. त्यामुळे तरुणाने थेट पोलिसांत धाव घेत आपबिती कथन केली. कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत नवरीसह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.

    तरुणांचे विवाह होत नसल्याचे हेरून नवरी शोधून लग्न लावणाºया अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. खरी माहिती लपवून खोटी नाती भासवून आर्थिक फसवणूक केली जाते. काही दिवसातच नवरीसह सगळेच पसार होतात. त्यामुळे तरुणांनी व त्यांच्या कुटुंबियांनी कोणाच्याही मोहाला बळी पडू नये. तसा संशय आल्यास पोलिसांना माहिती कळवावी.

    - चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, कर्जत