बंधाऱ्यात  बुडून सख्ख्या भावा बहिणीचा मृत्यू

राहुरी :वनविभागाच्या साठवण बंधाऱ्यात बुडून संख्या भावा बहिणीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली.

 राहुरी :वनविभागाच्या साठवण बंधाऱ्यात बुडून सख्ख्या भावा बहिणीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. यात वरशिदे शिवारातील पाणी साठवण बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या साक्षी शंकर गागरे  (८)व सार्थक शंकर गागरे  (१०) अशी  मृत्युमुखी पडलेल्या नावे असून त्याचा आकाली जाण्याने परिसरावर शोक कळा पसरली आहे .

नेहमीच्या प्रमाणे आई वडील शेत मजुरीसाठी वरशिदे येथे कामावर गेले.  घरी कोरोना महामारीमुळे शाळेला सुट्टी असल्याने सख्ख्ये लहान भाऊ बहिण घरी होते. वरशिदे शिवारात वन विभागाच्या साठवण तलाव आहे. गेल्या चार दिवसांपासून परिसरातील झालेल्या पावसामुळे बंधाऱ्याच्या पाणी साठवण क्षमता वाढली याचा अंदाज न आल्याने दोघे भाऊ बहीण पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यु झाला.