कार व दुचाकीची धडक ; दोघेजण गंभीर जखमी 

दोघे जण दुचाकीवरून संगमनेरकडे जात होते पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील गुंजाळवाडी येथे आले असता त्याच दरम्यान महामार्गावरून दुसर्‍या बाजूला जात असताना संगमनेर कडून पुणेच्या दिशेने जाणाऱ्या कारने जोराची धडक दिली त्यामुळे दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले आहे.

    संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील  गुंजाळवाडी येथे कार व  दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की माळेगाव पठार गावा अंतर्गत असलेल्या गोडेवाडी येथील जिजाभाऊ रावसाहेब दराडे व  संकेत बाळू गोडे,  हे दोघे जण दुचाकीवरून संगमनेरकडे जात होते पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील गुंजाळवाडी येथे आले असता त्याच दरम्यान महामार्गावरून दुसर्‍या बाजूला जात असताना संगमनेर कडून पुणेच्या दिशेने जाणाऱ्या कारने जोराची धडक दिली त्यामुळे दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले आहे.

    घटनेची माहिती समजताच पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील नारायण ढोकरे, संजय मंडलिक, भरत गांजवे, अरविंद गिरी, कैलास ठोंबरे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना औषध उपचारासाठी खासगी रुग्णवाहिकेतून संगमनेरला पाठवण्यात आसून यातील दोन गंभीर जखमी आहे त्यानंतर पोलिसांनी महामार्गावरील अपघातातील वाहणे बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली आहे जखमींच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती घारगाव पोलिस स्टेशनचे पोलिस हेडकाॅन्सटेबल आदिनाथ गांधले यांनी सांगितले आहे.