लसीकरण गोंधळाला केंद्र सरकार जबाबदार; जयंत पाटील यांचे टीकास्त्र

सुरुवातीच्या काळात देशाची गरज लक्षात न घेता केंद्र सरकारने लस निर्यात करायला परवानगी दिली. हे धोरण घेण्यामागे काय कारणे होती, याची मला माहिती नाही. मात्र जे साडेसहा कोटी डोस निर्यात झाले, तेवढ्यात निम्म्या महाराष्ट्राचे लसीकरण झाले असते. सध्या लसीकरणाचा जो गोंधळ सुरू आहे, त्याला यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेले केंद्र सरकारच जबाबदार आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला.

    अहमदनगर : सुरुवातीच्या काळात देशाची गरज लक्षात न घेता केंद्र सरकारने लस निर्यात करायला परवानगी दिली. हे धोरण घेण्यामागे काय कारणे होती, याची मला माहिती नाही. मात्र जे साडेसहा कोटी डोस निर्यात झाले, तेवढ्यात निम्म्या महाराष्ट्राचे लसीकरण झाले असते. सध्या लसीकरणाचा जो गोंधळ सुरू आहे, त्याला यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेले केंद्र सरकारच जबाबदार आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला.

    पाटील म्हणाले, राज्यात लसीकरणाचा जो गोंधळ सुरू आहे, त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. आपण आपल्या आरोग्य यंत्रणेद्वारे लसीकरणाचे व्यवस्थित नियोजन केले आहे. वेगाने लसीकरण करण्याची क्षमता असून सुरवातीला आपण ती दाखवूनही दिली आहे.

    मात्र, आता पुरवठाच कमी झाला आहे. 45 वर्षांवरील नागरिकांसाठी दुसरा डोस तरी नियमित मिळावा आणि सोबत त्या खालील गटाचे रखडलेले लसीकरण सुरू करता येईल, एवढ्या प्रमाणात लस उपलब्ध व्हावी, अशी आमची मागणी आहे. मात्र, लस निर्मितीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या केंद्र सरकारची धोरणे चुकत गेली. सुरवातीच्या काळात साडेसहा कोटी डोस निर्यात केली. त्याचे दुष्परिणाम आता भोगावे लागत आहेत, असेही पाटील म्हणाले.