पती-पत्नीमधील वाद विकोपाला; पतीकडून पत्नीचा खून

    राहुरी : तालुक्यातील गुंजाळे येथे पत्नीचा खून करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले. गुरुवारी (दि.19) सकाळी ही घटना उघडकीस आली. अलका वसंत शिदे (वय ५०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी पत्नीच्या खुनाच्या आरोपावरून नवऱ्यास अटक केली.

    नवरा-बायकोत रात्री कडाक्याचे भाडण झाले. अलका हिला मुलांना भेटायला श्रीगोदा येथे जायचे होते. या कारणाने दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झाले. रागाच्या भरात वसंत याने अलका हिला तीक्ष्ण हत्याराने जीवे मारले. सकाळी पत्नी अलका उठली नाही, असे त्याने आपल्या विवाहित मुलीला सांगितलं. मात्र, आपल्या आईला मारले असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने आरडाओरडा सुरु केला. आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यावेळी अलका मृत अवस्थेत पडलेली दिसली.

    वाबोरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मुलगी बाली शिंदे यांच्या फिर्यादीवरुन वसंत शिदे याच्यावर राहुरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव हे करीत आहेत.