जिल्ह्यातील २८ व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह

अहमदनगर : जिल्हा रुग्णालय आणि प्रवरा ग्रामीण रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे गुरुवारी पाठविलेल्या २८ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणी अहवाल शुक्रवारी रात्री प्राप्त झाले.

 जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली माहिती

अहमदनगर :  जिल्हा रुग्णालय आणि प्रवरा ग्रामीण रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे गुरुवारी पाठविलेल्या २८ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणी अहवाल शुक्रवारी रात्री प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. तसेच आज आणखी १४ व्यक्तींच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत.शुक्रवारी निगेटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये जामखेड, नगर आदी ठिकाणच्या व्यक्तींच्या अहवालाचा समावेश आहे.