corona ahamadabad

मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून यात सरकारी कर्मचारी देखील आहेत. तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पाहून अनेकांची धावपळ उडालीय. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून महिनाभरात 83 लाख दंड वसूल करून 66 हजार नागरिकांवर कारवाई करण्यात आलीये. तर 15 दिवसात 16 हजार लोकांवर कारवाई तर 28 लाख दंड आकारण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

  अहमदनगर : अहमदनगर शहरात कोरोना वाढत असल्याने शहरातील गर्दीवर दक्षता पथकांचा वॉच राहणार आहे. तर पालिकेकडून चार पथकांची नियुक्ती करण्यात आली असून नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई होणार आहेय. तसेच कोरोना रुग्ण वाढत असल्याने शहरातील दहा ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे. नगर शहरातील माणिकनगर, विनायक नगर, सारसनागर, केडगाव तसेच बोल्हेगाव येथे 3 तर सावेडी परिसरात 3 आशा 10 ठिकाणी मिनी कॅन्टेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता 28 मार्च पर्यंत याठिकाणी विविध निर्बंध घालण्यात आले आहेत.

  कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, या भागातील रहदारी आणि वाहने वापरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यावर संबंधितावर कायदेशीर कारवाई होईल, असे महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, बाहेर पडताना मास्क-सॅनिटायझर वापरावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

  नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून आर्थिक दंड

  मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून यात सरकारी कर्मचारी देखील आहेत. तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पाहून अनेकांची धावपळ उडालीय. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून महिनाभरात 83 लाख दंड वसूल करून 66 हजार नागरिकांवर कारवाई करण्यात आलीये. तर 15 दिवसात 16 हजार लोकांवर कारवाई तर 28 लाख दंड आकारण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

  जिल्हाधिकाऱ्यांकडून जनजागृती

  मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचे असल्याचं सांगत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन नागरिकांमध्ये जनजागृती केली. शिवाय नागरिकांना कोरोनाचे सगळे नियम पाळण्याचं आवाहन करत जे नागिरक नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे.