नगरमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत घट

नगरमधील सर्वात आनंदाची बातमी म्हणजे आज रविवारी तब्बल ५७६ कोरोनाबाधित रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या १० हजारांच्या वर पोहोचली आहे. तसेच रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ७८.०५ इतकी आहे.

संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तर काही भागांमध्ये रूग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. नगरमधील सर्वात आनंदाची बातमी म्हणजे आज रविवारी तब्बल ५७६ कोरोनाबाधित रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या १० हजारांच्या वर पोहोचली आहे. तसेच रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ७८.०५ इतकी आहे. 

गेल्या २४ तासांत नगरमध्ये ४७ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १२ हजार ९१६ इतकी झाली आहे. सध्या २ हजार ६८२ रूग्णांवर उपाचर सुरू आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे १५३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या नवीन रुग्णांमध्ये मनपा २७, पाथर्डी ३, नगर ग्रामीण १०, श्रीरामपूर १, कंटेन्मेंट झोनमध्ये २ अशा भागातील रुग्णांचा समावेश आहे.