दिपाली करडुळे यांची यशोगाथा  महिलांसाठी प्रेरणादायक

अहमदनगर : जन शिक्षण संस्थेत फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण पुर्ण करुन स्वत:च्या पायावर उभे राहून इतर महिलांना प्रशिक्षणासह रोजगार उपलब्ध करणार्‍या दिपाली शिवाजी करडुळे या संस्थेच्या आयडॉल ठरल्या आहेत.

स्वत:च्या पायावर उभे राहात अन्य महिलांना दिला रोजगार
अहमदनगर : जन शिक्षण संस्थेत फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण पुर्ण करुन स्वत:च्या पायावर उभे राहून इतर महिलांना प्रशिक्षणासह रोजगार उपलब्ध करणार्‍या दिपाली शिवाजी करडुळे या संस्थेच्या आयडॉल ठरल्या आहेत. दिपाली करडुळे यांनी मिरजगावात (तालुका कर्जत) थाटलेल्या टेलरिंगच्या दुकानास जन शिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार,कार्यक्रम अधिकारी शफकत सय्यद, कुंदा शिंदे, प्रशिक्षिका कमल पवार यांनी भेट देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.

जन शिक्षण संस्थेचे पवार यांनी एका महिलेने उभे केलेल्या या कार्याचे कौतुक करुन, करडुळे यांची यशोगाथा इतर महिलांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. करडुळे यांनी आपल्या यशस्वी जीवनात जन शिक्षण संस्थेचे बाळासाहेब पवार, कार्यक्रम अधीक्षक शफाकत सय्यद आणि कुंदा शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे सांगितले. जन शिक्षण संस्था महिलांना स्वयंरोजगाराचे धडे देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करणाचे कार्य सात त्याने करीत आहे. तर अशा यशस्वी महिलांच्या प्रकल्पास भेट देऊन त्यांचा गौरव देखील करण्यात येत आहे. दिपाली करडुळे यांनी शिवणकामात आवड असल्याने २०११ साली मिरजगावातून दररोज अहमदनगर शहरात जन शिक्षण संस्थेमध्ये येऊन फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण घेतले. मोठ्या जिद्दीने ते मिरजगाव ते नगर १३० कि.मी. चा खडतर प्रवास येऊन-जाऊन करीत होते. प्रशिक्षण पुर्ण करुन त्यांनी मिरजगावातील मुंजोबा चौका त महिलांचे कपडे शिवण्याचा टेलरिंग व्यवसाय सुरु केला. या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, त्यांनी इतर महिलांना देखील टेलरिंग कामाचे प्रशिक्षण देण्यास सुरु केले आहे. प्रशिक्षण घेणार्‍या महिलांना किमान ५ ते ६ हजार रुपये महिना देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम करडुळे करीत आहेत. त्यांच्याकडे सध्या १० महिला प्रशिक्षण घेत आहेत. त्यांचे कार्य जन शिक्षण संस्थेसाठी एक यशोगाथा ठरली आहे. विशेष बाब म्हणजे भविष्याचा विचार करुन प्रशिक्षणासाठी येणार्‍या महिलांचे त्यांनी जनधन योजने अंतर्गत खाते उघडून देऊन त्यांचा १२ रूपयात दोन लाखाचा, ३३० रुपयात दोन लाखांचा आणि एटीएमकार्ड वर २ लाखाचा अशाप्रकारे एकूण सहा लाखाचा विमा उतरवून घेतला आहे. तर या महिलांची अटल पेन्शन योजनेमध्ये नावे नोंदवली आहेत.