नागपूर-मुंबई महामार्गावर डिझेलचा टँकर पलटी ; दुचाकीस्वार जखमी तर आणखी एक टँकर खाली दाबल्याची चर्चा

कोपरगावकडून वैजापूरच्या दिशेने जाणारा टँकर क्रमांक एम एच ४६ बी बी ३०६६ हा बैलगाडीला ओव्हरटेक करताना पलटी झाला. यात एक दुचाकीस्वार जखमी झाला असून त्यास कोपरगावच्या फडके हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर एक जण टँकर खाली दबल्याची भीती व्यक्त होत आहे.

    कोपरगाव: नागपूर-मुंबई महामार्गावर दहेगाव बोलका शिवारात होटेल द्वारकमाई जवळ डिझेलचा टँकर मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास पलटी झाल्याची घटना घडली आहे . ओव्हरटेक करताना हा अपघात झाला असून यात एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे तर एक जण टँकर खाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे
    कोपरगावकडून वैजापूरच्या दिशेने जाणारा टँकर क्रमांक एम एच ४६ बी बी ३०६६ हा बैलगाडीला ओव्हरटेक करताना पलटी झाला. यात एक दुचाकीस्वार जखमी झाला असून त्यास कोपरगावच्या फडके हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर एक जण टँकर खाली दबल्याची भीती व्यक्त होत आहे.


    या अपघातामुळे दोन्हीकडची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली आहे या ठिकाणी कोल्हे कारखाना व नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून दोन रुग्णवाहिकाही तातडीने दाखल झाल्या आहेत संबंधित कंपनीशी कळविले असून त्यांचे तंत्रज्ञ या ठिकाणी पोहोचत आहे. टँकर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे पोलिसही तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी वाहतूक थांबवत टँकर बाजूला काढण्याचे काम सुरु केले आहे.