नगरवासियांनो, कोरोना नियमावलीचे उल्लंघन करू नका; प्रशासनाने केलीये ‘ही’ तयारी

    अहमदनगर : कोरोना नियमलीचे उल्लंघन करून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी आयुक्त शंकर गोरे यांनी आणखी दोन विशेष पथकाची स्थापना केली आहे. नगर शहरामध्ये आता नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेची सहा पथके कार्यरत आहेत.

    निर्बंध शिथिल झाले असले तरी कोरोना संकट अजून गेलेले नाही. शहरात बाजारपेठा, भाजी बाजार, खाजगी आस्थापना, सार्वजनिक ठिकाणांवर गर्दी आढळली, कोरोना नियमावलीचे उल्लंघन होताना दिसले तर कडक कारवाई करा, अशी सूचना अहमदनगर महानगरपालिका कोरोना दक्षता पथकांना आयुक्त शंकर गोरे यांनी पथकाला दिल्या. प्रभाग समिती निहायपूर्वी ४ आणि आता २ विशेष पथकांची नियुक्ती करत आयुक्त गोरे यांनी बैठक घेतली. त्यात कडक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या.

    सहाय्यक आयुक्त दिनेश सिणारे, परिमल निकम, शशिकांत नजान, नानासाहेब गोसावी, जितेंद्र सारसर, राकेश कोतकर सहाय्यक सूर्यभान देवघडे, नंदकुमार नेमाणे, राहुल साबळे, किशोर जाधव, भास्कर आकुबत्तीन, अमोल लहारे, राजेश आंनद, अनिल आढाव, एस.टी. वैराळ, बाळासाहेब पवार, आर.एस. सोनावणे, रिजवान ए. शेख बैठकीला उपस्थित होते. उपायुक्त यशवंत डांगे पथकाचे नियंत्रण अधिकारी आहेत.