साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आजपासून ऑनलाईन बुकिंग सुरू ; रोज १५ हजार भाविकांना घेता येणार दर्शन

साईबाबांच्या मंदिरात नित्यनेमाने चार आरत्या होतात. प्रत्येक आरतीसाठी ९० भाविकांना सोडण्यात येणार आहे. या ९० भाविकांमध्ये १० शिर्डी ग्रामस्थ तसेच ऑनलाईन पद्धतीने आरती बुकिंग करून येणारे २० भाविक आणि  ५० देणगीदार, व्हीव्हीआयपींना आरतीसाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती सीईओ भाग्यश्री  बानायत यांनी दिली.

    शिर्डी : घटस्थापनेपासून म्हणजेच ७ ऑक्टोबरपासून शिर्डीचे साईबाबा मंदिर भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. त्यासंदर्भातील सर्व तयारी साईबाबा संस्थानने केली आहे.रोज १५ हजार भाविकांना दर्शन दिलेजाणार असून आरतीसाठी केवळ ९० भाविकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. घटस्थापनेच्या दिवशी काकडा आरतीनंतर साईचे दर्शन सुरू होणार आहे. मंदिर रोज सकाळी काकडा आरतीला सुरू होऊन शेजारतीला बंद केले जाणार आहे.  साई मंदिर खुले केल्यानंतर भाविकांना कशा पद्धतीने दर्शनासाठी मंदिरात सोडणार नियमावली संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांनी आज मंगळवारी जाहीर केली. साई मंदिरात दिवस आवारात तब्बल १५  हजार भाविकांना साई समाधी दर्शन दिले जाणारआहे.  प्रति तासाला १ हजार १५० भाविकांना मंदिरात सोडले जाणार आहे.त्यात  ऑनलाइन पद्धतीने ५ हजार, ऑफलाईन पद्धतीने ५ हजार आणि ५ हजार व्हीव्हीआयपी सशुल्क पद्धतीने मंदिरात साई दर्शनसाठी सोडले जाणार आहे.
    साईबाबांच्या मंदिरात नित्यनेमाने चार आरत्या होतात. प्रत्येक आरतीसाठी ९० भाविकांना सोडण्यात येणार आहे. या ९० भाविकांमध्ये १० शिर्डी ग्रामस्थ तसेच ऑनलाईन पद्धतीने आरती बुकिंग करून येणारे २० भाविक आणि  ५० देणगीदार, व्हीव्हीआयपींना आरतीसाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.
    अशी आहे नियमावली
    -साई मंदिरात हार फुल नारळला बंदी
    -गुरूवारी निघणारी साईंची पालखी सध्या काढली जाणार नाही
    -साई मंदिरातील सत्यनारायण पूजा व अभिषेक पूजा बंद
    -भाविकांना समाधीला स्पर्श करता येणार नाही
    -दुरूनच हात जोडून साई दर्शन घ्यावे लागणार
    -भाविकांना दर्शन रांगेत ६ फुटाचे अंतर ठेवावे लागणार
    -६५ वर्षावरील आणि १० वर्षी खालेली व्यक्ती, गरेदर महीला  तसेच आजारी व्यक्तींना साई मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही
    -प्रत्येक दोन तासांनी साई मंदिर परिसराचे सॅनिटाइझेशन होणार
    -प्रसादालय सुरु होणार
    -साईचे लाडू प्रसाद आणि तिर्र्थाचे वितरण मात्र बंद
    -निवास स्थाने खुली होणार
    -एकदा रुम वापरल्यानंतर ती रुम चोवीस तास बंद ठेवल्यानंतर पुढच्या भाविकाला रूम
    -ऑनलाईन बुकींग पाच दिवस आधी करू शकणार
    -आजपासून ऑनलाईन बुकींग सुरु
    -साई संस्थानच्या कर्मचाºयांना मास्क आणि फेस शिल्ड वापरने बंधनकारक