साईबाबा मंदिरातील सजावटीसाठी थेट कॅनडातून देणगी

    अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून बाल कैन्हयाचं गुणगान केले जाते. तसेच रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून चालत आली़ आहे.

    आजही हा उत्सव मंदिरात साजरा केला जाईल. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू नये म्हणून भक्तांना दर्शनासाठी मंदिर बंदी असल्याने हा उत्सवही भक्तांना विना साजरा करण्यात येईल. या वर्षीच्या गोकुळाष्टमीनिमित्त कॅनडा येथील साईभक्त परुल गौरी यांच्या देणगीतून श्री साईबाबा समाधी मंदिर आणि मंदिर परिसरास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.