tempo crushed 3 people

या अपघातात फूटपाथवर झोपलेला मेहताब शेख ( २०, उत्तरप्रदेश) हा ठार झाला आहे. तर मुसाईद शेख(१८) आणि जावेद इरफान शेख (२२ उत्तरप्रदेश) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. टेम्पो चालक आणि वाहक हे दोघेही अपघातात जखमी झाले आहेत. यांच्यावर नगरमधील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

अहमदनगर : नगर-सोलापूर महामार्गावर चांदणी चौकामध्ये फूटपाथवर झोपलेल्या तीन बूट विक्रेत्यांना भरधाव टेम्पोने चिरडल्याची (Driver loses control of tempo)  धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव आयशर टेम्पोने रात्री १०च्या सुमारास फुटपाथवर झोपलेल्या तीन विक्रेत्यांना  (crushes 3 sleeping on sidewalk) चिरडले आहे. यातील १ जण जागीच ठार झाला आहे.

या अपघातात फूटपाथवर झोपलेला मेहताब शेख ( २०, उत्तरप्रदेश) हा ठार झाला आहे. तर मुसाईद शेख(१८) आणि जावेद इरफान शेख (२२ उत्तरप्रदेश) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. टेम्पो चालक आणि वाहक हे दोघेही अपघातात जखमी झाले आहेत. यांच्यावर नगरमधील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

काय आहे घटना जाणून घ्या

सोलापूरकडून अमहमदनगरच्या दिशेने मालवाहू आयशर टेम्पो येत होता. चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण चांदणी चौकातील आरटीओ ऑफिसजवळ सुटले. म्हणून टेम्पो थेट फुटपाथवर चढला. त्या ठिकाणी फुटपाथवर झोपलेल्या तरुणााला टेम्पोने चिरडले. तसेच अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. भीषण धडक झाल्याने टेम्पो चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली आहे.